जाहिरात

'कालिया कुमारस्वामी', काँग्रेस नेत्याची केंद्रीय मंत्र्यांवर अभद्र टीका, नवा वाद रंगला!

जमीर अहमद हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. चामराजपेट मतदारसंघातून 5 वेळा आमदार राहिलेले जमीर अहमद हे अल्पसंख्याक व्यवहार खात्याचे प्रभारी आहेत.

'कालिया कुमारस्वामी', काँग्रेस नेत्याची केंद्रीय मंत्र्यांवर अभद्र टीका, नवा वाद रंगला!

काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारचे मंत्री जमीर अहमद यांनी केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर वांशिक टिप्पणी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. एका जाहीर सभेला संबोधित करताना जमीर अहमद यांनी कुमारस्वामी यांना ‘कालिया कुमारस्वामी' असा उल्लेख केला. अहमद यांच्या विधानावरुन कर्नाटकचे राजकारण चांगलेच तापले आहे. जमीर अहमद हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. चामराजपेट मतदारसंघातून 5 वेळा आमदार राहिलेले जमीर अहमद हे अल्पसंख्याक व्यवहार खात्याचे प्रभारी आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, नुकतेच भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले  नेते सीपी योगेश्वर यांच्याबद्दल जमीर अहमद बोलत होते. यावेळी जमीर अहमद म्हणाले, 'काँग्रेसच्या काही नेत्यांशी मतभेद झाल्यामुळे ते (सीपी योगेश्वर) बसपमध्ये दाखल झाले. अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि दुसरा पर्याय नसताना, "कालिया" कुमारस्वामी हे भाजपपेक्षा जास्त धोकादायक आहेत असे वाटल्याने जनता दलात जाण्याची इच्छा नसल्याने ते भाजपमध्ये दाखल झाले. आता आमच्या पक्षाचे उमेदवार सीपी योगेश्वर यांची ही घरवापसी आहे.

नक्की वाचा: 'उद्धव ठाकरेंकडून बाण गेला फक्त खान उरले...' मालाडमध्ये 'राज'गर्जना

अहमद यांच्या या विधानानंतर आता कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलर पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जेडीएसने ट्विटरवर पोस्ट करत 'जमीर अहमद यांनी चन्नापटना पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान वांशिक अपशब्द वापरले. केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांना जमीर अहमद खान यांनी उर्दूमध्ये "कालिया कुमारस्वामी" (ब्लॅक कुमारस्वामी) म्हणत त्यांचा अपमान केला. असे करून, त्यांनी कृष्णवर्णीय लोकांचा वांशिक अपमान केला आहे आणि वांशिक भेदभाव केला आहे... त्यांच्या तोंडून येणारे हे वांशिक द्वेषाचे शब्द अक्षम्य आहेत, अशा शब्दात टीका केली आहे.

तसेच  जेडीएसने राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वरा आणि रामनगर पोलिसांना या प्रकरणी कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. जमीर अहमद यांच्यावर जातीय अत्याचार, जातीयवाद आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पक्षाने काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि सीएम सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे.

महत्वाची बातमी: 'बटेंगे तो कटेंगे', काँग्रेस अध्यक्षांनी योगी आदित्यनाथ यांची केली दहशतवाद्याशी तुलना, Video

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com