जाहिरात

काँग्रेसच्या विद्यमान आमदारांची धाकधूक वाढणार? तिकीट वाटपाचा निकष ठरला

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे.

काँग्रेसच्या विद्यमान आमदारांची धाकधूक वाढणार? तिकीट वाटपाचा  निकष ठरला
मुंबई:

विधानसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीत  महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी लढत होणार आहे. त्यामुळे युती आणि आघाडीची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी आतापासूनच फिल्डींग लावली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उमेदवारी देताना काँग्रेसने एक फॉर्म्यूला तयार केला आहे. शिवाय काही निकष ही ठरवले आहेत. त्यानुसारच  पक्षाचे तिकीट दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यामान आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याची चर्चा सुरू झाली आहे. शिवाय त्यांची धाकधूकही वाढली आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काँग्रेसचे निकष ठरले 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळालं. राज्यात मोठा पक्ष काँग्रेस ठरला. मात्र असं असून देखील विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे आमदार फुटले.काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली. या गोष्टी पाहात आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जपून पावलं टाकण्याचे ठरवले आहे. काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत, त्यांची चाचपणी केली जाणार आहे. प्रत्येक आमदारांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे.  शिवाय प्रत्येक मतदार संघाचा सर्वे ही केला जाणार आहे. त्यानंतर तिकीत देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. जर एखाद्या आमदारा बद्दल नकारात्मक अहवाल आला तर त्याला तिकीट नाकारलं जाणार आहे. त्यासाठी काँग्रेस आपला अंतर्गत सर्वे करणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  'शाह, फडणवीसांचे आश्वासन, आता खूप वेळ झाला, पंधरा दिवस थांबणार नाही तर...'

महाविकास आघाडीची बैठक

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडणार आहे. काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाल्यामुळे सर्वाधिक जागांचा प्रस्ताव काँग्रेस पक्ष ठेवणार आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र आता सर्व आमदारांचा सर्वे केला जाणार आहे. त्यानंतर काँग्रेस आपल्या जागांवर दावा करणार असल्याची माहिती मिळत आहे. जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पडाव्यात यासाठी काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने रणनिती आखली आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत, ठाकरेंचा दिल्ली दौरा महत्वाचा का?

'त्या' आमदारांचे काय होणार? 
 

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली होती. पक्षाच्या काही आमदारांनी पक्ष आदेशा विरोधात मतदान केले होते. त्यांच्या विरोधात अजूनही कोणतही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांच्या विरोधात काय कारवाई केली जाते याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातूनही तशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे पक्षा विरोधात भूमिका घेणाऱ्यां सोडलं जाणार नाही हा संदेश जाईल. अशा स्थितीत त्या आमदारांवरही या कालावधीत कारवाईची दाट शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Delhi New CM : आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, एकमताने झाली निवड
काँग्रेसच्या विद्यमान आमदारांची धाकधूक वाढणार? तिकीट वाटपाचा  निकष ठरला
Sanjay raut claim Mahavikas Aghadi Consensus regarding the allocation of seats in the Legislative Assembly in Mumbai
Next Article
मोठी बातमी! मविआचं जागा वाटप ठरलं, मुंबईतल्या 99 टक्के जागांवर सहमती