'त्यांना तसं बोलायला सांगितलं असेल' जयंत पाटील यांनी उडवली अजित पवारांची खिल्ली

अजितदादा सध्या इव्हेंट मॅनेजरचे जास्त ऐकतात. ते सांगतील तेवढेच बोलतात. आता त्यांना असं बोला म्हणजे फायदा होईल असं सांगितलं असेल.

जाहिरात
Read Time: 3 mins
धाराशीव:

बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं ही चुक होती. अशी जाहीर कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या या वक्तव्या वरून आता त्यांची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सध्या धाराशीवमध्ये आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अजित पवारांना शाब्दीक चिमटे काढले. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

अजित पवारांवर तोंड सुख घेण्याची एकही संधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोडत नाहीत. त्यात अजित पवारांनी बारामतीत सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळें विरूद्ध उभे करणेही चुक होती याची कुबूली दिली होती. यावरून जयंत पाटील यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. अजितदादा सध्या इव्हेंट मॅनेजरचे जास्त ऐकतात. ते सांगतील तेवढेच बोलतात. आता त्यांना असं बोला म्हणजे फायदा होईल असं सांगितलं असेल. त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केलं असावं असं म्हणत त्यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसचे दोन आमदार 'हाता' ची साथ सोडणार? मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अर्थ काय?

जर ते भाजपबरोबर गेलो, ही माझी चुक होती असं बोलले तर ते खरं वाटलं असते. पण ते तसं काही बोलले नाहीत. त्यावरून त्यांची भूमिका बदलली आहे असे वाटत नाही. त्यांना जे सांगितलं जातं तेच ते बोलतात. हल्ली ते इव्हेंट मॅनेजरचं जास्त ऐकतात असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे राज्यात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले गेले आहे. ही यात्रा सध्या धाराशीवमध्ये आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अजित पवारांना धारेवर धरले. 

ट्रेंडिंग बातमी -  'लाडक्या बहिणी'साठी वर्षा गायकवाडांनी पदर खोचला, निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नवा चेहरा

राज्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुर्ण ताकदीने कामाला लागा. राज्यात सत्ता आणणे महत्वाचे आहे. मुख्यमंत्री कोण होईल ही बाब महत्वाची नाही. सत्ता येणे हे महत्वाचे आहे. महायुतीच्या सरकारला पाय उतार करायचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काँग्रेसचा होईल की राष्ट्रवादीचा होईल. याचा विचार कोणी करून नका. आपल्याला सत्ता आणयची आहे हे लक्षात ठेवा असे ते यावेळी म्हणाले. 

Advertisement

ट्रिंडिंग बातमी - 'भावानं मागितलं असतं तर सर्व काही देऊन टाकलं असतं,' काय पक्ष आणि चिन्ह, सुप्रिया सुळेंचं उत्तर

सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. लाडकी बहीण कधीही पैशाकडे पाहात नाही. अरे भावाने मागितलं असतं तर सर्व देऊन टाकलं असतं. काय पक्ष आणि काय चिन्ह.. काहीही मागितलं असतं तरी दिलं असतं. रिकाम्या हाताने आले होते आणि तसंच जाणार आहे. मी काय गठूड घेऊन जाणार आहे का?' असं सुळे यांनी अजित पवार यांना त्यांचे नाव न घेता सुनावले. शिवाय महिलांचा स्वभाव या सरकारला कळालाच नाही, असंही त्या म्हणाल्या. 

Advertisement