मुख्यमंत्री कोण? ना शिंदे, ना पवार, फडणवीसांनी कोणाचं नाव घेतलं?

पुण्यात भाजपचे अधिवेशन सुरू आहे. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री कोण असेल हेच फडणवीसांनी सांगून टाकले आहे. त्यांनी केलेल्या या नव्या घोषणेमुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins
पुणे:

 मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असे विचारले जात होते. त्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर दिले आहे. पुण्यात भाजपचे अधिवेशन सुरू आहे. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री कोण असेल हेच फडणवीसांनी सांगून टाकले आहे. त्यांनी केलेल्या या नव्या घोषणेमुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे उमदेवार असतील असे सांगितले जात होते. मात्र यावेळी फडणवीसांनी सर्वांनाच चकीत करत, मुख्यमंत्री कोण असेल हेच स्पष्ट केले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा 

पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा मुख्यमंत्रीपदाबाबत आहे. या घोषणेचा परिणाम महायुतीतवर काय होतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. फडणवीस या अधिवेशनात बोलताना म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्वात मोठा पक्ष हा भाजपच असेल. शिवाय त्यानंतर महायुतीचेच सरकार  राज्यात बनेल. मुख्यमंत्री कोण असेल? मुख्यमंत्री कोणाचा असेल? हा खरा प्रश्न नाही. राज्याच्या जनतेची सेवा करायची आहे. त्यासाठी राज्याची सत्ता मिळवायची आहे हे आपले लक्ष आहे. त्यानंतर मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल असे स्पष्ट करत फडणवीसांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. याच फडणवीसांना या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणूक लढवली जाईल असे स्पष्ट केले होते. यावेळी त्यांनी ते बोलणे टाळले आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  'विधानसभा निवडणूक महायुतीच्या नेतृत्वात लढणार'; चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

भाजपचं मोठा पक्ष होणार 

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राजकारणात काही तडजोडी कराव्या लागता. त्या सत्ता बदलताना केल्या गेल्या. जे काही बदल झाले ते काहींना आवडले तर काहींना आवडले नाहीत. पण राज्यात सत्ताबदल करणे गरजेचे होते. सर्वांना बरोबर घेवून पुढे जायचे आहे असे फडणवीस यावेळी म्हणाले. पक्षात अनेक लोक आहेत. जे काही मिळेल या उद्देशाने काम करत नाहीत. तर ते एका विचाराने काम करत आहे. विधानसभा निवडणूकीत भाजपला पावणे दोन कोटी मते मिळतील. आणि भाजप हाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष असेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात सत्ताही महायुतीच येईल असा दावा  त्यांनी केला. शिवाय मी जे बोलत आहे ते लिहून ठेवा असेही त्यांनी सांगितले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - भाजपचं ठरलं! 'संघटन हीच शक्ती, मनामनात राष्ट्रभक्ती'

ठाकरे - पवारांना प्रश्न 

यावेळी फडणवीसांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी प्रश्न केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत तुमची भूमिका काय आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे त्यांनी स्पष्ट करावे असे आव्हान त्यांनी दिले. दोन समाजात दुफळी माजवण्याचे काम काही जण करत आहेत. त्यातून त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. आरक्षण टिकवण्याचे काम खऱ्या अर्थाने भाजपने केले आहे. आता फेक नरेटिव्हला कोणी बळी पडणार नाही. सत्य जनते समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत मविआ आणि महायुती यांच्या दोन लाख मतांचाच फरक होता असे त्यांनी सांगितले. तो फरक लाडकी बहीण योजनेनंतर भरून निघाल्याचा दावाही त्यांनी केला. 

Advertisement


 

Advertisement
Topics mentioned in this article