फडणवीस करणार आपल्या नावावर अनोखे रेकॉर्ड, जे भुजबळ,आबा, दादांना जमलं नाही ते...

1978 पासून ते 2024 पर्यंत जे जे उपमुख्यमंत्री झाले त्यांना कधीही मुख्यमंत्री होता आले नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Devendra Fadnavis  : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र त्यांची ही शपथ खास असणार आहे. कारण ज्या वेळी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्याच वेळी त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे. तो विक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यत ज्या व्यक्तीने उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे त्याला कधीही मुख्यमंत्री होण्याची संधी मिळालेली नाही. 1978 पासून ते 2024 पर्यंत जे जे उपमुख्यमंत्री झाले त्यांना कधीही मुख्यमंत्री होता आले नाही. पण हे रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस आपल्या नावावर करणार आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपद अनेक नेत्यांनी आतापर्यंत भूषवले आहे. 1978 साली सर्वात पहिल्यांदा नाशिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. त्यावेळी वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ केवळ चार महिन्याचा राहीला होता. तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले. पण त्यांना पुढे कधीही मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यानंतर सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते. सोळंकेचा कार्यकाळ हा दोन वर्षाचा राहीला. पण पुढच्या राजकीय जिवनात त्यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कधीच मिळाली नाही. 1983 साली वसंतदादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी रामराव आदिक हे उपमुख्यमंत्री झाले. त्यांनाही पुढे कधीच मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाही. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं

1995 साली शिवसेना भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात आले. त्यावेळी आधी मनोहर जोशी आणि नंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले. या दोघांच्याही मंत्रिमंडळात गोपिनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. मुंडेंची मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा होती. पण त्यांनाही ही संधी मिळाली नाही. त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचेही स्वप्न अधुरे राहीले. जर मुंडे जिवंत असते तर कदाचीत तेच फडणवीसां ऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. पण तसे झाले नाही. त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाला. युतीचे सरकार जावून आघाडीचे सरकार आहे. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले. तर छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री झाले. भुजबळांना दोन वेळा उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली पण ते मुख्यमंत्री होवू शकले नाहीत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी

छगन भुजबळांनंतर आर. आर. पाटील यांनीही उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं. ते सलग चार वर्ष या पदावर होते. पण त्यांनाही मुख्यमंत्रिपदाला गवसणी घालता आली नाही. आर. आर. पाटील यांच्यानंतर अजित पवार यांनी एकदा नाही तर जवळपास पाच वेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री होण्याची अनेक वेळा अजित पवारांनी इच्छा व्यक्त केली. पण त्यांना या पदावर काम करण्याची संधी काही मिळाली नाही. पुढे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी एक चर्चा सगळीकडेच होती. जो एकदा उपमुख्यमंत्री होतो तो परत मुख्यमंत्री होत नाही. त्यामुळे फडणवीस आता राज्याचे परत मुख्यमंत्री होणार नाहीत. हा समज देवेंद्र फडणवीस यांनी खोटा ठरवला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - भाजपचा नेता निवडायला उशीर का झाला? विजय रुपाणींनी आतली बातमी सांगितली

उपमुख्यमंत्री राहीलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते. याचे पहिले उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस असणार आहेत. त्यांनी 1978 पासून सुरू असलेला समज यावेळी मोडला आहे. उपमुख्यमंत्री असलेली व्यक्त मुख्यमंत्री होवू शकते हे त्यांनी आता दाखवून दिले आहे. त्यामुळे हा अनोखा विक्रमही देवेंद्र फडणवीसांच्या नावावर होणार आहे. मुख्यमंत्री झालेली उपमुख्यमंत्री होते हा एक जसा विक्रम होता. तसाच आता उपमुख्यमंत्री झालेली व्यक्त पुन्हा मुख्यमंत्री होवू शकते हे ही फडणवीसांनी दाखवून दिले आहे.