सागर कुलकर्णी
महाराष्ट्र राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर आला आहे. 5 डिसेंबर रोजी महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार असून त्याआधी मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. . या बैठकीसाठी भाजपचे नेते आणि आमदार भाजप विधीमंडळ कार्यालयात दाखल झाले आहेत. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणूनही देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले आहे.
Devendra Fadnavis to be sworn in as Maharashtra CM on Dec 5; his name finalised in BJP core committee meeting, say sources
— Press Trust of India (@PTI_News) December 4, 2024
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती, ज्याचा अंतिम फैसला अखेर झाला आहे. आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आणि 11 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नवे आमदार आणि नेते उपस्थित झाले आहेत. केंद्राकडून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन निरीक्षक म्हणून या बैठकीला हजर असतील. या बैठकीत पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा: पंजाबमध्ये सुखवीर बादल यांच्यावर गोळीबार! सुवर्ण मंदिरासमोर जीवघेणा हल्ला; थरारक VIDEO
या बैठकीमध्ये सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड केली. भारतीय जनता पक्षाच्या गटनेता निवडीनंतर आज महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचीच विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड होईल, अशी शक्यता होती. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होईल, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
कोणकोणते नेते दाखल झाले?
भाजपच्या या बैठकीला देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, अशोक चव्हाण, गिरीश महाजन, विनोद तावडे, गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे, अतुल सावे, सदाभाऊ खोत यांच्यासह पक्षातील आमदार उपस्थित आहेत. या बैठकीनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
महत्वाची बातमी: संतापजनक! माजी उपसरपंचाचा १५ वर्षीय मुलीवर अत्याचार, पीडितेने विष घेतले अन्...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world