भाजप विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली. याबाबतची अधिकृत घोषणा भाजपचे निरिक्षत आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केली. विधानसभेच्या सर्व सदस्यांनी एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिला असंही त्यांनी यावेळी सांगितले. दुपारी तिन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत. त्यानंतर ते सरकार स्थापनेचा दावा करतील असंही रुपाणी यांनी सांगितले. गुरूवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. त्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन, देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटून गेल्यानंतरही भाजपचा विधीमंडळ पक्षाचा नेता निवडला गेला नव्हता. शिवाय मुख्यमंत्री कोण याबाबतही सस्पेन्स होता. ऐवढं मोठं बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेचा दावा केला गेला नव्हता. शिवाय मुख्यमंत्री कोण हे ही ठरले नव्हते.त्यात भाजपनेही आपला विधीमंडळ पक्षाचा नेता ठरवला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. महायुतीत मतभेद असल्याचेही बोललं जात होतं. याबाबतही रुपाणी यांनी स्पष्टी करण दिलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं
महायुतीमध्ये कोणत्याही स्वरूपाचे मतभेद नाहीत. शिवाय आमचा पक्ष हा एकत्रित पणे निर्णय घेत असतो. सर्व गोष्टींचा विचार केला जातो. आमच्या पक्षात हुकुमशाही नाही. त्यामुळे सर्वांना विचारात घेवून निर्णय घेतला गेला. त्यामुळेच नेता निवडीला वेळ लागला असं रुपाणी म्हणाले. शिवाय आम्ही निवडणूक युतीमध्ये लढलो होतो. त्यामुळे युतीतल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. त्यांना विश्वासात घेवून निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. आता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी
निवडणुकीत महायुतीने जी आश्वासने दिली आहेत. त्यानुसारच सरकार काम करेल. शिवाय मंत्रिमंडळात कोण असेल याचा निर्णयही चर्चा करून होईल. त्यावर अंतिम निर्णय आज रात्री होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महायुतीमध्ये नेते नाराज असल्याचं बोललं जात आहे. पण महायुतीत कोणीही नाराज नाही. सर्व जण खुश आहेत असं रुपाणी यावेळी म्हणाले. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय देशातील भाजपचे बडे नेतेही उपस्थित राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world