
Dhananjay Munde News : सध्या वादाच्या केंद्रस्थानी असलेले मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी ( Bell's Palsy disease) नावाच्या आजाराचं निदान झालंय. स्वत: धनंजय मुंडेंनी पोस्ट करत याबाबतची माहिती दिलीय. अलिकडच्या काळातली कॅबिनेट बैठकांमधली गैरहजेरी आणि जनता दरबार न भरवण्यावरून मंत्री धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठली होती. अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांना जनता दरबार घेण्याचे आदेश दिले होते.. त्यामुळे धनंजय मुंडेंनी अजितदादांच्या आदेशालाच हरताळ फासल्याची चर्चा सुरू होती. त्यावर मुंडे यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले धनंजय मुंडे?
माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.
त्याच दरम्यान मला Bell's palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही.
( नक्की वाचा : Exclusive : विधानसभा निवडणुकीत तिकीटांची विक्री झाली, 'उबाठा' पक्षावर माजी प्रवक्त्याचा गंभीर आरोप )
याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल,' असं ट्विट मुंडे यांनी केलं आहे..
माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 20, 2025
त्याच दरम्यान मला…
काय आहे बेल्स पाल्सी आजार?
बेल्स पाल्सी आजाराला चेहऱ्याचा पक्षघात असंही म्हंटलं जातं. या आजारात चेहऱ्याच्या एका बाजूला लकवासदृश्य व्याधी होते. तोंडाच्या एका बाजुचा भाग लटकल्यासारखा दिसतो
व्याधी झालेल्या बाजुचा डोळा बंद करता येत नाही. चेहऱ्याच्या नसांवर सूज येते आणि तो भाग दुखतो. जेवताना अडचण निर्माण होते. तोंडातून सतत लाळ गळते डोळ्यातून सतत पाणी येतं, डोकेदुखी वाढते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world