जाहिरात

Sharad Pawar: पटेल, तटकरेंना सुनेत्रा पवारांनी बाजूला का केलं? शरद पवारांनी सांगितली आतली खबर

शिवाय त्यांचे कर्तूत मला माहित आहे या पवारांच्या वक्तव्याचा नक्की अर्थ काय हे ही राजकीय पंडीत शोधत आहेत.

Sharad Pawar: पटेल, तटकरेंना सुनेत्रा पवारांनी बाजूला का केलं? शरद पवारांनी सांगितली आतली खबर
  • सुनेत्रा पवारांनी प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांना बाजूला करून पक्षावर नियंत्रण मिळवल्याची चर्चा
  • शरद पवारांचे पटेल आणि तटकरे यांना राष्ट्रीय कार्यकारणीत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या का दिल्या नाही यावर भाष्य
  • पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने जनमानसात प्रभावी लोकांना संधी देण्याचा विचार असल्याचे पवार म्हणाले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. याचे वेगवेगळे अर्थ ही काढले जात आहे.सुनेत्रा पवार यांनी अगदी हुशारीने प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांना बाजूला केल्याचं ही काही जण बोलत आहेत. पक्षावर एक प्रकारे संपूर्ण नियंत्रण आपलेच कसे असेल याची सोय सुनेत्रा पवारांनी केली आहे. याबाबत शरद पवारांना ही विचारणा करण्यात आली. शिवाय मागे तुमचा काही हात आहे का असं ही विचारलं गेलं. यावर पवारांनी बोलकी प्रतिक्रीया दिली आहे. शिवाय पडद्या मागे काय घडलं याची आतली खबर ही त्यांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काय सुरू आहे याचा अंदाज येत आहे. 

प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांना राष्ट्रीय कार्यकारणीत महत्वाची जबाबदारी देण्यात आली नाही यामागे काय कारण असावे अशी विचारणा शरद पवारांना करण्यात आली.  त्यावर ते म्हणाले यावर भाष्य करण्याचं कारण नाही. तो दुसरा पक्ष आहे. त्यांचे निर्णय घ्यायचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. पण मला असं वाटतं की पक्षाच्या भवितव्यासाठी जनमानसात सगळे जे प्रभावी लोक आहेत त्यांना त्यांनी संधी दिली आहे. पण ज्यांचा प्रभाव कितपत आहे? याची शंका कुणाच्या मनात असेल ती व्यक्त करायची होती का हे माहित नाही. असं वक्तव्य करून पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत आता पटेल आणि तटकरे यांचे महत्व कमी होणार किंवा ते तेवढेसे फायद्याचे राहीले नाहीत असं पवारांनी एक प्रकारे संकेत दिले. 

नक्की वाचा - Sharad Pawar: 'मोदींच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा पण...' शरद पवारांनी टाकली गुगली, केली मोठी मागणी

पुढे बोलताना ते असं ही म्हणाले की मला पटेल आणि तटकरे चांगले माहित आहेत. जरी हे दोघे सध्या आमच्या सोबत नाहीत. पण गेली 25 ते 30 वर्षे ते आमच्या सोबत होते. पटले दिल्लीत काम करत होते. त्यांनी मी जवळून पाहीलं आहे. तर सुनिल तटकरे हे आधी जिल्ह्याचे नेते होते. नंतर त्यांनी राज्यात काम केलं. ते अर्थमंत्री होते. पुढे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ही झाले. त्यामुळे त्यांच्यात काय कर्तूत्व होते त्याची मला कल्पना आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीतल्या अंतर्गवादाच्या जखमेवर बोट ठेवलं. शिवाय एक प्रकरे आता तटकरे आणि पटेल यांचे महत्व पक्षात कमी केलं जात असल्याचं ही ते म्हणाले. शिवाय त्यांचे कर्तूत मला माहित आहे या पवारांच्या वक्तव्याचा नक्की अर्थ काय हे ही राजकीय पंडीत शोधत आहेत.  

नक्की वाचा - Cabinet decision: राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 14 निर्णय, पुणे, नाशिकबाबत कोणते निर्णय झाले, पाहा यादी

कुणाला काय करावे आणि कुणाला काय जबाबदारी द्यावे हा त्यांच्या नेतृत्वाचा तो अधिकार आहे असं ही शरद पवार म्हणाले. त्यांच्या नेतृत्वाने काही मुल्यमापन केले असेल. त्यानुसार या दोघांबाबत निर्णय घेतला असावा असं ही शरद पवार यावेळी म्हणाले. हा निर्णय घेण्या मागे तुमच्या सल्ल्याचा हात आहे असं ही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर आम्ही चर्चा केली नाही. किंवा माझ्याशी ही कुणी चर्चा केली नाही असं ते म्हणाले.  राष्ट्रवादीचे आमदार बाहेर पडणार आहेत याबाबत ही त्यांना विचारलं गेलं. मात्र याची माहिती नाही. फक्त पेपरमध्ये वाचलं असं ही त्यांनी सांगितलं. विलीनिकरणाची चर्चा अजितदादा असताना जयंत पाटील यांच्यात झाली होती. अजित पवारांची एकत्र येण्याची इच्छा होती. त्यांनी तशी आपल्या समोर व्यक्त ही केली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर ती पुर्णपणे बंद झाल्याचं पवारांनी सांगितलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com