जाहिरात

' नेते युरोपात, कार्यकर्ते कोमात, आमची कुठेही शाखा नाही' ठाकरेंना उद्देशून एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी

Eknath Shinde on Uddhav Thackeray :  शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बंडखोर नेत्या प्रीती बंड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली.

' नेते युरोपात, कार्यकर्ते कोमात, आमची कुठेही शाखा नाही' ठाकरेंना उद्देशून एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Eknath Shinde on Uddhav Thackeray :  शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बंडखोर नेत्या प्रीती बंड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी झालेल्या मेळाव्यात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले शिंदे?

एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रीती संजय बंड यांचे शिवसेनेत स्वागत केले. शिवसैनिकांना पाहून थकवा गायब होतो, टॉनिक मिळते. परिवारातील लोकांना भेटण्याचा आनंद मिळतो, बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यांचे विचार आपण पुढे घेऊन जात आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.

सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला याचा आनंद आहे. या पदाचा वापर सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे यासाठी केला पाहिजे  पायाला दिवस रात्र भिंगरी लावून एकनाथ शिंदे महाराष्ट्रात फिरला  विरोधकांनी टाकलेले स्पीड ब्रेकर उखडून टाकले, विकासाला चालना दिली, असं शिंदे यांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : Operation Sindoor : 'ते काय म्हणतात त्याला...' मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं राज ठाकरेंना उत्तर )
 

अडीच वर्षात इतके निर्णय घेतले की इतिहासात कधीही कोणी निर्णय घेतले नाहीत. मुख्यमंत्री सहायता निधीतून साडेचारशे कोटी रुपये वाटले. विदर्भातील दीडशे सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. अडीच वर्षाच्या काळात लोकाभिमुख कामे केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणी आणि लोकांनी भरभरून मतदान केलं 232 जागा महायुतीच्या आल्या  आम्ही 80 जागा लढवल्या 60 जागा जिंकल्या. काही जागा कमी मतांनी हरलो. जे सांगत होते एकही जागा येऊ देणार नाही ते शंभर लढले आणि 20 जागा जिंकले, याची आठवण शिंदे यांनी करुन दिली. 

नेते युरोपात, कार्यकर्ते कोमात

निवडणूक आयोगाने आपल्या बाजूला निर्णय दिला आहे. आता नेते युरोपात कार्यकर्ते कोमात आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणतात ती कधीही बंद होणार नाही. प्रत्येक योजना टप्याटप्याने लागू करणार आहोत, आम्ही प्रिंटिंग मिस्टेक सरकार नाही. एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो. प्रीती बंड स्वगृही आल्या आहेत तुमची काळजी तुमचा भाऊ एकनाथ शिंदे घेतल्याशिवाय राहणार नाही. संजय बंड बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट कार्यकर्ते होते. सहकाऱ्यांना आम्ही सवंगडी समजतो घरगडी नाही, आता काय समजतात माहिती आहे, असा टोमणा त्यांनी ठाकरेंना लगावला. 

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी गोरगरिबांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करणार आहे. कार्यकर्ता जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याला मदत केली पाहिजे  संजय बंड सारख्या कार्यकर्त्याला काय मिळालं,  एखाद्या कार्यकर्त्याला धुळीला कसं मिळवायचं त्याचे क्लासेस लावायचे असतील तर मुंबईमध्ये बांद्रामध्ये एकाच ठिकाणी आहे, आमची कुठेही शाखा नाही, अशी टीका शिंदे यांनी केली.

स्वाभिमानी व्यक्ती बंड करतात. जेव्हा अन्याय झाला तेव्हा कशाचाही विचार केला नाही. शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली, धनुष्यबाण वाचविण्यासाठी  उठाव केला.  लोकांनी स्वीकारले म्हणून 80 मधील 60 आमदार निवडून आले. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदे सत्तेला हापापलेला नाही. गावाला गेलो म्हणजे नाराज झालो.. काहीतरी होणार असं येतं असतं. तेव्हा मी मजा घेत असतो, काही लोक घरातून निघत नाहीत. बाहेर निघाल्यावर परदेशात जातात त्यांना बोलण्याचा अधिकार नाही,  असं शिंदे यांनी यावेळी सुनावलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com