'हा तर फक्त ट्रेलर, विधानसभेला पिक्चर दाखवू'

महायुतीची मते एकत्र राहीलीच पण महाविकास आघाडीची मतेही आम्हाला मिळाली असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ही तर सुरूवात आहे. विधानसभेला असेच चित्र दिसेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. यानंतर महायुतीच्या नेत्यांनी विधानभवनातच विजयोत्सव साजरा केला.  महायुतीचा विजय होईल हे आम्ही पहिल्या पासून सांगत होतो. त्यानुसार मोठा विजय मिळवला आहे अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तर महायुतीची मते एकत्र राहीलीच पण महाविकास आघाडीची मतेही आम्हाला मिळाली असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ही तर सुरूवात आहे. विधानसभेला असेच चित्र दिसेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एकनाथ शिंदे काय म्हणाले? 

विधान परिषदेत मिळालेला विजय हा महायुतीला मोठा विजय आहे अशी प्रतिक्रीया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महायुतीच्या 9 जागा निवडून येणार हे आम्ही आधीच सांगत होतो. विजया बद्दल सर्व उमेदवारांचे अभिनंद करतो असे शिंदे म्हणाले. ही चांगली सुरूवात झाली आहे. लोकसभेत फेक नरेटिव्ह घेतली होती. आता तसे होणार नाही. महायुतीने चांगली बॅटींग केली. त्यामुळे महाविकास आघाडीची विकेट निघाली असेही ते म्हणाले. हा फक्त ट्रेलर आहे. पिक्टर विधानसभेला बाकी आहे असे शिंदे म्हणाले. शिवाय विधानसभेत जनता आम्हालाच निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

ट्रेंडिंग बातमी - Vidhan Parishad Election result Live Update : 'शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही'

'मविआची मते ही आम्हालाच मिळाली' 

महायुतीने 9 उमेदवार जिंकून आणले आहेत. काही जण वल्गना करत होते. पण त्यांच्या वल्गना वल्गनाच राहील्या अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महायुतीची मते एकसंधी राहीली. पण महाविकास आघाडीची मते ही आम्हाला मिळाल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. जे उमेदवार निवडून आले आहेत ते सर्व सामान्य कुटुंबातील आहेत. जनतेमध्ये मिसळून काम करणारे हे सर्व जण आहेत असेही फडणवीस म्हणाले. पंकजा मुंडेंच्या विजया बद्दलही फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान ही सुरूवात आहे, विधानसभेला ही आम्हीच निवडून येवू असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. 

ट्रेंडिंग बातमी - 'ज्या काँग्रेस आमदारांची मते फुटली त्यांची हाकलपट्टी करा'

अजित पवारांनी व्यक्त केला आनंद 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे दोनही उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी झाले. विजयासाठी आवश्यक असलेली पहिल्या पसंतीची मते त्यांना मिळाली. शिवाय शरद पवार गटाच्या काही आमदारांची मते फोडण्यातही यश आल्याची चर्चा आहे. विजयी उमेदवारांचे अजित पवार यांनी त्यांच्या दालनात अभिनंदन केले. विशेष म्हणजे अजित पवारां बरोबर असलेले सर्व आमदार त्यांच्या मागे ठाम पणे उभे राहीले हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.   
 

Advertisement