अमजद खान, प्रतिनिधी
Ambarnath Political Latest Update : अंबरनाथमध्ये सत्ता स्थापनेसाठी सुरु झालेला राजकीय खेळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.भापने काँग्रेससोबत युती केल्यानं राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगली होती. नैतिकतेची भाषा करणाऱ्या काँग्रेसने भाजपसोबत जाणाऱ्या 12 नगरसेवकांविरोधात कारवाई केली. अपक्ष झाल्यावर हे नगरसेवक भाजपात गेले. पण शिवसेनेने भाजपला मोठा धक्का देत भाजपसोबत गेलेल्या अजित पवार गटाचे 4 आणि 1 अपक्ष नगरसेवक फोडून सत्ता स्थापनेची तयारी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्मार्ट खेळी करून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर धक्कातंत्र अवलंबवला.
अपक्ष उमेदवाराच्या मदतीने 32 चा आकडा गाठला, पण..
अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपच्या नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर सभेचा कोरम पूर्ण करण्यासाठी भाजपने काँग्रेस आणि अजित पवार गटासह अन्य एक अपक्ष उमेदवाराच्या मदतीने आता 32 चा आकडा गाठला होता. अंबरनाथ विकास आघाडीच्या नावाने सत्ता स्थापनेची तयारी दाखवली. परंतु,या राजकीय घटनेची देशभरात चर्चा रंगल्यानंतर काँग्रेसने नैतिकतेची भाषा केली आणि भाजपसोबत गेलेल्या 12 नगरसेवकांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली.
नक्की वाचा >> The Raja Saab Review : फिल्म इंडस्ट्रीवर करतोय 'राज', कसा आहे प्रभासचा 'द राजा साहब?' वाचा करेक्ट रिव्ह्यू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की, "नेत्यांविरोधात कारवाई केली गेली. भाजपने कारवाई केली नाही. अपक्ष झालेल्या 12 नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश दिला सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली.". मात्र अजित पवार गटाचे चार आणि एक अपक्ष जे भाजप सोबत होते.त्यांना एकनाथ शिंदे यांनी फोडले. आत्ता शिवसेनेचे 27 , अजित पवार गटाचे चार आणि एक अपक्ष असा 32 संख्याबळाचा आकडा गाठला आहे. आत्ता अंबरनाथ नगररिषदेत शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे.