
शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. खरंतर संघटनात्मक पदांच्या निवडणुका, संघटनात्मक बदलाचे प्रस्ताव, या सोबतच पक्षाचे राजकीय ठराव कार्यकारणी मध्ये मांडले जातात. शिवसेनेच्या या कार्यकारणीमध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या मुख्य नेते पदाचा प्रस्ताव मांडला जाईल. ही एक लोकशाही प्रक्रिया असली तरीही एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राहतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना पक्ष फुटीपूर्वीच्या पक्षामध्ये मुख्य नेते पदाच्या वरती पक्षप्रमुख पद होते. मात्र शिवसेना फुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेने पक्षप्रमुख पद निर्माणच केले नाही. शिंदेंच्या शिवसेनेत मुख्य नेतापद हेच सर्वोच्च पद असणार आहे. आणि याच पदावर एकनाथ शिंदे यांची पुन्हा नियुक्ती केली जाणार.
यासोबतच या कार्यकारणीमध्ये पक्ष सचिवांच्या नियुक्ती बद्दल काही ठराव मांडले जातील. यात सचिव पदाचे चेहरे बदलले जाण्याची दाट शक्यता आहे. नव्या सचिव पदी तरुण आणि श्रीकांत शिंदेंचे जवळचे असणार आहे.
( नक्की वाचा : Hindi Language Controversy : ठाकरे बंधू एकत्र येणार, पण मोर्च्याची वेळ आणि ठिकाण बदलणार? कसा निघणार तोडगा? )
कार्यकारणी आणि कार्यकारणीच्या माध्यमातून घेण्यात येणारी अंतर्गत निवडणूक ही संघटनात्मक वार्षिक प्रक्रिया आहे. शिवसेना पक्ष फुटीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी ही प्रक्रिया राबवली नव्हती. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख निवडीसाठी कार्यकारिणी घोषित केली होती खरी मात्र त्यानंतर पक्ष कुणाचा हा निर्णय निवडणूक आयोगाच्या गोठात गेला. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या कायदेशीर पेचात उद्धव ठाकरे अडकले. अशा प्रकारचे कायदेशीर पेच शिंदेनसमोर निर्माण होऊ नये म्हणून शिंदेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून दरवर्षी न चुकता राष्ट्रीय कार्यकारणी आयोजित करून काही महत्त्वाचे ठराव संमत केले जातात. 30 जून रोजी होणारी ही कार्यकारणी त्याचाच एक भाग आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world