पापाचा घडा कोणाचा भरला? शिंदेंचे ठाकरेंना जशास तसे प्रत्युत्तर

यांच्या पापाचा घडा आता भरला आहे. तो लपवण्यासाठी योजना आणल्या जात आहेत असा टोलाही ठाकरे यांनी लगावला होता. त्याला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नागपूर:

उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शीव संवाद मेळावा घेतला. या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, भामटे असा उल्लेख ठाकरे यांनी केला. शिवाय यांच्या पापाचा घडा आता भरला आहे. तो लपवण्यासाठी योजना आणल्या जात आहेत असा टोलाही ठाकरे यांनी लगावला होता. त्याला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिंदेंचे प्रत्युत्तर काय? 

सध्याचे सरकार हे जुमलेबाज सरकार आहे. त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. हीपापं लपवण्यासाठी त्यांनी योजना आणल्या आहेत. त्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, ज्या काही जागा जिंकता आल्या त्या फक्त आणि फक्त धनुष्यबाणामुळे जिंकता आल्या. हा विजय तुमचा विजय नाही असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पापाचा घडा कोणाचा भरला आहे हे जनता आता विधानसभा निवडणुकीत दाखवून देईल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांनी अडीच वर्षात केलेली कामे आणि आम्ही दोन वर्षात केलेली कामांची तुलना केल्यावर कोणा सरस आहे हे समजेल असेही शिंदे म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी -  मविआत मोठा भाऊ कोण? पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदाच थेट बोलले

ठाकरेंवर शिंदेंचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेहे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. यावरून शिंदे यांनी ठाकरेंना लक्ष केले. जे कधी घराच्या गेट बाहेर येत नव्हते ते आता शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. आम्ही बहीणांना रक्षाबंधनाची भेट दिली आहे. दर महिन्याला 1500 रूपये देणार आहोत. शिवाय तीन सिलेंडरही मोफत देणार आहोत. तुम्ही कधी कोणाला दिलं नाही. पण आमची देण्याची दानत आहे. ही योजना कायमस्वरूपी आहे असंही सांगायला ते विसरले नाहीत. 

ट्रेंडिंग बातमी - ठाकरेंनी हुकमचा एक्का टाकला, आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य, शिंदे-फडणवीसांचे टेन्शन वाढणार?

विधानसभेत परिणाम भोगावे लागतील 

लोकसभेला कोणाच्या मतांवर जिंकला हे सर्वांना माहित आहे. बाळासाहेबांचे विचार सोडून अभद्र युती तुम्ही केली. त्याची प्रचेती आता विधानसभेला येतील. केलेल्या चुकीचे परिणाम भोगावे लागतील असेही ते म्हणाले. पक्ष चोरला, चिन्ह चोरलं हे किती दिवस रडत बसणार आहात. लोकसभा निवडणुकीत आमचाच स्ट्राईक रेट जास्त आहे असा दावाही शिंदे यांनी केला. समोर समोर झालेल्या लढतीत आपलेच उमेदवार विजयी झाल्याचे ते म्हणाले.  

Advertisement