हफ्त्याचे रेटकार्ड! पुणे अपघातावरून फडणवीस- वडेट्टीवार भिडले, जोरदार खडाजंगी

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

पुणे पोर्शेकार अपघात प्रकरण आज विधानसभेत गाजले. याबाबतची लक्षवेधी विरोधी पक्षाच्यावतीने विधानसभेत मांडण्यात आली. त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाच्या आडून गृह विभागाला धारेवर धरत गंभीर आरोप केले. पोलिसांचे हाफ्ते कसे सुरू आहेत, ड्रग्जचा सुळसुळा, पोलिस आयुक्तांची भूमीका, रेटकार्ड असे एकापाठोपाठ एक आरोप केले. त्याला तेवढ्याच जोरदार पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या दोघांमधली खडाजंगी सभागृहाने अनुभवली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विजय वडेट्टीवार यांचे गंभीर आरोप 

पोर्शे कार अपघात प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गृह विभागावर गंभीर आरोप करत विधान सभा हादरवून सोडली. पुण्यात कायद्याचा धाक राहीला नाही. पुण्यात सर्रास ड्रग्जची विक्री होती. पुण्याचा उडता पंजाब झाला आहे. एक जण कार चालवतो आणि दोन जणांना चिरडोत त्याला तात्काल जामीन कसा मिळतो? या मागे कोणाचे राजकीय लागेबांधे आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रक्ताचे नमुने बदलण्या पर्यंत हिंमत होते हे कोणाच्या जिवावर असे  प्रश्न करत वडेट्टीवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. पुण्यात जवळपास 450 ओपन टेरेस हॉटेल आहेत. त्यांच्याकडून 5 लाख रूपये दर महिन्याला हाफ्ता घेतला जातो असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तर छोट्या हॉटेलकडून 75 ते अडीच लाखाचा हफ्तावसूली होत आहे. पबचा दरही पाच लाख असल्याचे ते म्हणाले. पुण्यात जवळपास 27 अनधिकृत पब सुरू होते. कोणाकडून किती हाफ्ता घ्यायचा याचे रेटकार्ड तयार आहेत ही बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यांना कोणताही परवाना दिला नव्हता, तरी ते चालू होते. असा घणाघाती आरोप त्यांनी केला. त्यावेळी पुण्याचे पोलिस आयुक्त झोपले होते काय असा सवाल ही त्यांनी केला.या पोलिस आयुक्तांना पदावरून काढून टाका अशी जोरदार मागणीही त्यांनी केली. सध्याच्या व्यवस्थेमुळे पुण्याचा 500 कोटींचा सरकारचा महसूल बुडत असल्याचा दावाही त्यांनी विधानसभेत केला.     

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - राष्ट्रवादीत काय चाललंय? अजित पवारांच्या आमदारांची बंद दाराआड जयंत पाटलांशी चर्चा

फडणवीसांचे वडेट्टीवारांना प्रत्युत्तर 

वडेट्टीवारंनी चढवलेल्या जोरदार हल्ल्याला फडणवीसांनीही तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले. पुणे ही सांस्कृतीक राजधानी आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. जगभरातून उद्योग पुण्यातच येतात. त्यामुळे पुण्याचा उल्लेख उडता पंजाब असा करू नये. तसे बोलणे एका जबाबदार नेत्याला शोभत नाही, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पोर्शे कार प्रकरणात पुणे पोलिस आयुक्तांवर कारवाई करावी अशी एकही बाब पुढे आली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी या प्रकरणात अतिशय पारदर्शक पणे काम केले असे फडणवीस म्हणाले. रेट कार्डचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. कोणी तरे रेटकार्ड घेवून येतो आणि सांगतो हे रेटकार्ड असे बोलणेही योग्य नाही. अशी कोणतीही रेटकार्ड नाहीत. रेटकार्ड बद्दल काँग्रेसलाच माहित असेल असा टोलाही त्यांनी लगावला. मात्र विरोध पक्षनेत्यांनी दिलेली माहिती सत्य समजून चौकशी केली जाईल असेही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Exclusive : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं नाही, भाजपाच्या बड्या नेत्यानं सांगितला प्लॅन

अपघातानंतर फोन करणारा मंत्री कोण? 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक महत्वाचा प्रश्न या प्रकरणात उपस्थित केला. पोर्शे कारने दोघांना चिरडल्यानंतर त्या अल्पवयीन तरूणाला पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले होते. त्यावेळी त्या पोलिस स्टेशनला आणि पोलिस आयुक्तांना कोणी फोन लावला होता? त्यांच्यावर कुणी दबाव आणला होता? फोन लावणाऱ्यामध्ये कोण मंत्री आमदार होता यांची नावे जाहीर करा असा आवाहन जितेंद्र आव्हड यांनी केले. मात्र आयुक्तांना किंवा त्या पोलिस स्टेशनला कुणीही मंत्र्यांनी फोन केला नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तिथले स्थानिक आमदार मात्र पोलिस स्थानकात गेले होते. ते तिथल्या पोलिस निरीक्षका बरोबर बोलले ही माहिती फडणवीसांनी दिली. 
 

Advertisement