जाहिरात

फडणवीसां बरोबर कोणा कोणाला अटक करण्याचे आदेश होते? परमबीर सिंहांचा नवा बॉम्ब

राजकीय विरोधकांना अटक करण्यासाठी कसा दबाव होता याची जंत्रीच त्यांनी मांडली आहे. याबाबतचे व्हिडीओ पुरावे आपल्याकडे आहेत असा दावा परमबीर सिंह यांनी केला आहे.

फडणवीसां बरोबर कोणा कोणाला अटक करण्याचे आदेश होते? परमबीर सिंहांचा नवा बॉम्ब
नवी दिल्ली:

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बाबत आणखी गौप्यस्फोट केले आहेत. हे करत असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही या सर्व कटात कसा सहभाग होता हे सांगून खळबळ उडवून दिली आहे. शिवाय राजकीय विरोधकांना अटक करण्यासाठी कसा दबाव होता याची जंत्रीच त्यांनी मांडली आहे. याबाबतचे व्हिडीओ पुरावे आपल्याकडे आहेत असा दावा परमबीर सिंह यांनी केला आहे. वेळ पडल्यास ते आपण सार्वजनिक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

परमबीरांच्या नव्या आरोपाने खळबळ 

परमबीर सिंहांनी नवे आरोप करताना राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ठाण्यातील एका जमिन प्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यात मलाही गोवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. ऐवढेच नाही तर या प्रकरणी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेचेही आदेश देण्यात आले होते. हे सर्व अनिल देशमुख यांचे स्विय सहाय्यक संजय पांडे यांच्या मार्फत सुरू होते.  या शिवाय गिरीष महाजन आणि जयकुमार रावल यांनाही अटक करण्यासाठी आपल्यावर दाबव टाकला होता असंही त्यांनी सांगितले. शिवाय मुंबई बँकेचे संचालक प्रविण दरेकर यांच्या विरोधातही कारवाई करण्यास सांगितले होते.  मात्र असे करण्यास आपण नकार दिली होता असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी -  सुपारी आंदोलन! 'होय ते आमचेच शिवसैनिक पण...' संजय राऊतांनी हात का झटकले?

ठाकरे पवारांना होती कल्पना 

राजकीय विरोधकांना अटक करण्यासाठी सांगितले जात होते. त्यात देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन, प्रविण दरेकर, जयकुमार रावल आणि एकनाथ शिंदे यांचा समावेश होता. याबाबत सिल्वर ओकवर शरद पवारांनी भेटायलाही बोलवले होते. त्यावेळी तिथे अनिल देशमुखही उपस्थित होते. महाजन आणि रावल यांच्या विरूद्ध कारवाई करा असे पवारांनीही सांगितले होते असा दावा परमबीर सिंह यांनी केला आहे. शिवाय प्रविण दरेकर यांच्या प्रकरणात आपल्याला उद्धव ठाकरे यांनी बोलवून घेतले होते. त्यावेळीही अटक करण्यासाठी दबाल टाकला गेला असा दावा त्यांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी : Vinod Kambli : 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर विनोद कांबळी पहिल्यांदा दिसला, तब्येतीबाबत म्हणाला... )

'वसूलीसाठी परस्पर अधिकाऱ्यांशी बोलणी' 

अनिल देशमुख गृहमंत्री असताना सर्व सिस्टम खराब करून टाकण्यात आली होती. वसूलीसाठी ते थेट अधिकाऱ्यांना बंगल्यावर बोलवत होते. बदल्यांसाठी पैसे घेतले जात होते. अनेकांचे पैसे घेवून काम केले जात नव्हते असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. शिवाय मलाही बोलवून शंभर कोटीचे टार्गेट दिले होते. त्यासाठी वसूली आणि छापे टाकण्यास सांगितले जात होते पक्षाने टार्गेट दिले आहे ते पुर्ण करावे लागेल. त्यासाठी प्रेशर आहे असे अनिल देशमुख सांगत होते असेही ते म्हणाले. हा आकडा केवळ मुंबईचा होता. इतर राज्यातून किती वसूली केली जात होती हे समोर आले नाही. त्यासाठी काही अधिकाऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी -  अजित पवार 'तसे' नाहीत, राज ठाकरेंनी सांगितला नेमका फरक

ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिलं पण...    

अनिल देशमुखांकडून आपल्यावर वसूलीसाठी दबाव टाकला जात होता. शिवाय परस्पर अधिकाऱ्यांना संपर्क केला जात होता. अधिकारीही त्रस्त झाले होते. ते सर्व गोष्टी मला सांगत होते. त्यामुळे या सर्व गोष्टी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्याच बरोबर शरद पवार, जयंत पाटील यांनाही सांगितले होते. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेवटी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहावे लागले असं परमबीर सिंह यांनी सांगितले.  

ट्रेंडिंग बातमी -   'राज ठाकरेंना अडवू नका, जाब विचारायचा असेल तर गचांडी धरून...' जरांगे नेमकं काय बोलले?

एकत्रित नार्को टेस्ट करा 

देशमुखांवर आरोप केल्यानंतर तसे आपण कोर्टालाही सांगितले होते. त्यानंतर आपली चुक झाली. माफी मागण्यासाठी आपण तयार आहोत. तुम्ही कोर्टात जे सांगितले आहे ते मागे घ्यावे अस अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख याने आपल्याला सांगितले होते. त्याचे पुरावेही आपल्याकडे आहे. डीजीपी बनवण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. आपण याबाबत नार्को टेस्ट करण्यासाठीही तयार आहोत. सलील देशमुख यांचीही आपल्या बरोबर नार्को टेस्ट करावी असे आव्हान त्यांनी दिले आहे. अनिल देशमुख यांनी आपल्यावर केलेले आरोप हे चुकीचे आहे. त्यावेळी आपल्यावर खोट्या कारवाई करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता असे त्यांनी सांगितले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
आनंदराव अडसुळांचे पुनर्वसन, पण मुलावर होणार अन्याय? अमरावतीमध्ये नवा ट्विस्ट
फडणवीसां बरोबर कोणा कोणाला अटक करण्याचे आदेश होते? परमबीर सिंहांचा नवा बॉम्ब
ajit pawar reaction on badlapur physical assault case  political news
Next Article
Ajit Pawar : 'आरोपींचे कापून टाकलं पाहिजे', बदलापूरच्या घटनेवर अजित पवार धारधार वक्तव्य