जाहिरात

Shiv Sena News: कर्नाटकात ST चालकाला काळं फासलं, शिवसैनिकांची गांधीगिरीकरत कर्नाटकच्या चालका बरोबर...

चालक वाहकांचा अपमान होत आहे. यापुढे जर असा घटना घडल्या तर कर्नाटकच्या गाड्या महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

Shiv Sena News: कर्नाटकात ST चालकाला काळं फासलं, शिवसैनिकांची गांधीगिरीकरत कर्नाटकच्या चालका बरोबर...
नांदेड:

कर्नाटकमध्ये सध्या महाराष्ट्रातल्या एसटी बसना टार्गेट केले जात आहे. कलबुर्गी इथं एसटी महामंडळाची बस गेली होती. त्यावेळी बस चालका बरोबरच वाहकाच्या तोंडाला तिथल्या कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले होते. शिवाय एसटी बसवर कन्नड भाषेत जय कर्नाटक असे लिहीले होते. ही बस नांदेड आगाराची होती. ही घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद नांदेडमध्ये ही उमटले आहे. झालेल्या प्रकाराचा शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरीकरत निषेध केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कर्नाटक सरकारच्या हीबस महाराष्ट्रात येतात याचा विसर मात्र कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांना पडलेला दिसतोय. त्यांनी कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बस, त्याच बरोबर चालक वाहका बरोबर गैरवर्तन केले. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. कर्नाटकची बस नांदेड बस डेपोमध्ये आली होती. त्यावेळी ठाकरे गटाचे शिवसैनिक तिथे एकत्र आले. त्यांनी कर्नाटकात झालेल्या प्रकाराचा निषेध केला. शिवाय कर्नाटक विरोधात आंदेलन करत गांधीगिरीही केली. तर दुसरीकडे कर्नाटक सरकारला आणि कन्नड रक्षक वेदीका संघटनेलाही इशारा दिला.   

ट्रेंडिंग बातमी - Big News : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड, जळगावातील खळबळजनक घटना

शिवसैनिकांनी यावेळी गांधीगिरी कन्नड वाहक आणि चालकांचा सत्कार केला. त्यांना हार घालण्यात आले. त्यांना भगव्या शाली देण्यात आल्या. कर्नाटक राज्यातील तीन बसेस नांदेडमध्ये आल्या होत्या. या तिन्ही बस अडवण्यात आल्या. त्यानंत त्यांच्या वाहक आणि चलकांना त्यांच्या बस समोर उभे करण्यात आले. त्याच वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर या बसेस रोखून धरण्यात आल्या होत्या. 

ट्रेंडिंग बातमी - रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे कोण? CM फडणवीसांच्या प्रतिक्रियेने राजकारणात खळबळ; म्हणाले...

नांदेड आगारातील आगार प्रमुखांना शिवसैनिकांनी घेराव घातला होता. महाराष्ट्रातील बसवर हल्ले होत आहे. चालक वाहकांचा अपमान होत आहे. यापुढे जर असा घटना घडल्या तर कर्नाटकच्या गाड्या महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान या सर्व आंदोलनात दोन्ही बाजूनच्या गाड्यांना लक्ष्य केले जात आहे. शिवाय चालक आणि वाहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.