भाजपही आता मारकडवाडीत सभा घेणार, प्रकरण चिघळणार?

उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्या गुंडाना आव्हान देतो, आम्ही काय मेलेल्या आईचं दुध प्यायलो नाही. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या असं आवाहन राम सातपूते यांनी दिलं.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

मारकडवाडीला शरद पवारांनी भेट दिल्यानंतर आता तिथलं वातावरण चांगलचं तापलं आहे. शरद पवारांनी मारकडवाडीच्या जनतेच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात काही जणांनी पवारांच्या सभेला विरोध करण्याचाही प्रयत्न केला. पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही मारकडवाडीत येऊन तिथल्या लोकांचे म्हणणे ऐकण्याचे आवाहन केले. त्यानुसार आता भाजपही मारकडवाडीत सभा घेणार आहे. याबाबतची माहित या मतदार संघाचे माजी आमदार राम सातपुते यांनी दिली आहे. त्यामुळे मारकडवाडीतलं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मारकडवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर सभा घेणार आहेत. अशी माहिती माजी आमदार राम सातपुते यांची दिली आहे. यावेळी बोलताना राम सातपुके यांनी पवारांच्या सभेला तिनशे लोक होती. गोपीचंद पडळकर यांच्या सभेला किती माणसं येतात हे लवकरच समजेल असंही ते म्हणाले. आज जो बॅनर प्रकरणा वरून वाद झाला ते मारकडवाडीचे ग्रामस्थ नसून ते मोहिते पाटील यांचे गुंड होते असा आरोपही राम सातपूते यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांचे मारकडवाडीत जावून फडणवीसांना आवाहन, नेमकं काय म्हणाले?

या सर्व मारकडवाडीच्या प्रकरणाचा मास्टर माईंड रणजितसिह मोहिते पाटील आहे असा आरोपही राम सातपूते यांनी केला. उत्तम जानकर यांनी माझ्या विरोधात जर हातवर करून मतदान करा असं आव्हान दिलं असेल तरी ते आपल्याला मान्य आहे असेही ते म्हणाले. उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्या गुंडाना आव्हान देतो, आम्ही काय मेलेल्या आईचं दुध प्यायलो नाही. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, तुम्हाला उत्तर देण्यासाठी हा  राम सातपुते तयार आहे असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'होय राजीनामा द्या, पण त्या आधी...', मारकडवाडीत राजीनाम्यावरून पवारां समोर काय झालं?

मारकडवाडीत शरद पवारांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. यावेळी बोलताना उत्तम जानकर यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहोत असं सांगितलं. ट्रायल म्हणून निवडणूक आयोगाने बॅलेटवर मतदान घ्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केली. तर जयंत पाटील यांनी राजीनामा देण्याची सध्या गरज नाही. जर बॅलेटवर मतदान घेणास सरकार तयार असेल तर काही हरकत नाही असं पाटील म्हणाले. तर मारकडवाडीचा मुद्दा आपण संसदेत मांडू असं शरद पवारांनी यावेळी आश्वासन दिलं.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - कानडी अत्याचार! बेळगावात मराठी मेळाव्याला कर्नाटक सरकारची बंदी, महाराष्ट्रातल्या नेत्यांनाही अडवणार

त्यामुळे सध्या तरी मारकडवाडीचं वातावरण चांगलच तापलं आहे. राज्याच्या आणि देशाच्या चर्चेचा विषय झाला आहे. शरद पवारानंतर आता भाजपनेही या ठिकाणी सभा घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे वातावरण आणखी तापणार आहे.  गोपिचंद पडळकर यांनी या आधी ही शरद पवारांवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. त्यात आता ते मारकडवाडीत जावून काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष्य लागले आहे.