पहिल्या निवडणुकीत किती खर्च केला? शरद पवारांनी आकडाच सांगितला

जाहिरात
Read Time: 2 mins
जालना:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्याच्या स्थितीत देशातील सर्वात जेष्ठ राजकारणी आहेत. त्यांचा राजकारणातला अनूभव हा दांडगा आहे. आतापर्यंत लोकसभेच्या 12 सार्वत्रिक निवडणूका त्यांनी पाहिल्या आहेत. पुर्वी निवडणूका कशा लढवल्या जायच्या? त्यावेळचे मु्द्दे काय होते? निवडणुकीसाठी खर्च किती होत? या आठवणींना या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शरद पवारांनी उजाळा दिला. शिवाय आपल्या पहिल्या निवडणुकीत आपण किती खर्च केला होता हे ही त्यांनी सांगितलं. शिवाय पुर्वीच्या निवडणुकांत कोण खर्च करत असतं त्याचीही माहिती त्यांनी या निमित्ताने नव्या पिढीला दिली.

हेही वाचा - 'महाराष्ट्राचा महानालायक कोण?' बावनकुळेची जीभ घसरली


पवारांनी पहिल्या निवडणुकीत किती खर्च केला?  

बरोबर 56 वर्षापूर्वी शरद पवारांनी पहिली विधानसभा निवडणूक लढली होती. ही निवडणूक बारामती विधानसभेतून ते लढले होते. त्यावेळी त्यांना अवघा 11 ते 12 हजार रुपयांचा खर्च आला होता असे पवारांनी सांगितले. शिवाय हा खर्च लोकवर्गणीतून झाला होता हे सांगायला ते विसरले नाही. त्यानंतर पहिली लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी 4 लाख खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. पुर्वी निवडणूक म्हटली की लोकांचा मोठा सहभाग असायचा. मात्र आता चित्र बदललं आहे. साधनं वाढली आहेत. खर्चावर काही मर्यादा राहीली नाही. ज्याचं सरकार आहे ते कसाही पैसा उभारत आहेत. निवडणूक यंत्रणाच हातात घेतली जात आहे असेही पवार म्हणाले. पुर्व असे चित्र नव्हते असंही त्यांनी सांगितलं. 


'विचारांची लढाई संपली' 

पुर्वी विचारांची लढाई निवणुकीत दिसून यायची. त्यावेळी नेतृत्व करणारे नेते, माणसं त्यांची उंची फार मोठी होती. त्यांचे विचार गांभिर्याने घेतले जात होते. देश कोणत्या दिशेने नेणार, शेती, शिक्षण, रोजगार, याबाबक काय देणार याची चर्चा होत होती. आता मात्र एककलमी कार्यक्रम आहे. तो म्हणदे विरोधकांवर हल्लाबोल करणे. त्यांना संपवणे. त्यांच्यावर वैयक्तीक हल्ला करणे. राजकारणात सध्या वैर आलं आहे. सुसंवाद जो पुर्वी असायचा तो आता राहीलेला दिसत नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. देशाला काय देणार हे आताचे राज्यकर्ते सांगत नाहीत, असंही ते म्हणाले. विचारांची लढाई विचारानी लढली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

'या वेळी बदल नक्की' 

भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. मात्र अशी स्थिती देशा नाही. त्यामुळे यावेळी बदल होणार असे चित्र आहे. अजून उमेदवारी अर्ज अनेक ठिकाणी भारायचे आहेत. त्याआधीच चारशे पारचा नारा याचा अर्थ काय असेही ते म्हणाले. दुरदर्शनचे भगवेकरण केले जात आहे. हा सरकारी यंत्रणांचा गैरवापर असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Advertisement