जाहिरात
Story ProgressBack

'महाराष्ट्राचा महानालायक कोण?' बावनकुळेची जीभ घसरली

Read Time: 2 min
'महाराष्ट्राचा महानालायक कोण?' बावनकुळेची जीभ घसरली
नागपूर:

लोकसभेच्या निवडणुकीत आता चांगलाच रंग भरू लागला आहे. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून आपण दिल्लीला जाणार आहे असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याचे पडसाद भाजपच्या गोटात उमेटले. आधी फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी ठाकरेना आडेहात घेतलं. पण हे करत असताना बावनकुळेंची जीभ मात्र घसरली. 

हेही वाचा -  आदित्य ठाकरे मुख्यमंत्री? उद्धव यांच्या 'त्या' दाव्याला फडणवीसांकडून उत्तर

बावनकुळेंची जीभ घसरली 


देवेंद्र फडणवीसांवर उद्धव ठाकरे यांनी टिका केल्यानंतर त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले होते. पण त्यानंतरही बावनकुळेही त्या विषयावर बोललेच. महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला होता. अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. ट्वीट करत त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.  

  
ठाकरेंवर हल्लाबोल 


पालघर साधू हत्याकांडात ठाकरे मूग गिळून गप्प बसले. १०० कोटी वसुली रॅकेट चालवत कारभार केला. कोविडमध्ये लोक मरत असताना घोटाळे केले. मृतदेहाच्या बॅगमध्ये मलिदा लाटला. याला कोडगेपणा म्हणतात. असा हल्लाबोलही बावनकुळे यांनी केला. देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्रिपदावर बसायचं, मुलाला मंत्रिपद द्यायचं आणि बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडायचं याला कोडगेपणा म्हणतात. असंही ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात. 

लोकसभा निवडणुकीत जनाधार गमावला 


लोकसभा निवडणुकीत जनाधार मिळत नसल्यानं उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली आहे. त्यामुळे वाट्टेल ते बडबडत आहेत. तुम्ही कितीही शिव्याशाप द्या, देवेंद्रजींसारख्या सच्चा नेत्याला त्यानं फरक पडणार नाही पण येत्या निवडणुकीनंतर जनता तुम्हाला मात्र कायमचं घरी बसवेल हे नक्की असं बावनकुळे म्हणाले आहेत. 

उद्धव ठाकरेंची टिका काय? 


आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून आपण दिल्ली जाणार असल्याचे आश्वासन बाळासाहेबांच्या खोलीत देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला ठाकरे वेडे झाले आहेत असे प्रत्युत्तर फडणवीसांनी दिले होते. तर फडणवीसांनी जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी असे म्हटले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination