जाहिरात

Mumbai News: खुशखबर! मेट्रो, मोनो, बेस्ट, लोकलसाठी आता एकच तिकीट, काय आहे प्लॅन?

सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते. त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Mumbai News: खुशखबर! मेट्रो, मोनो, बेस्ट, लोकलसाठी आता एकच तिकीट, काय आहे प्लॅन?
मुंबई:

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूकीबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 'इंटीग्रेशन ऑफ तिकिटिंग सर्विसेस' या बाबत 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीतकेंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. या तिकीट सर्विसेसमुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. त्यांना या माध्यमातून  मेट्रो, मोनो, बेस्ट आणि लोकलमध्ये एकाच तिकीटावर प्रवास करता येणार आहे. अनेक वर्षापासून याची मागणी होत होती. ती आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

आजचा दिवस मुंबईतील दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शहरी वाहतुकीसाठी समर्पित असे सिंगल प्लॅटफॉर्म अ‍ॅपचा आढावा घेण्यात आला. या एकाच सिंगल अ‍ॅपवर मेट्रो, मोनोरेल, बेस्ट बस तसेच उपनगरीय रेल्वे, जी मुंबई शहराची लाईफलाइन म्हणून ओळखली जाते, ती देखील यावर उपलब्ध असेल. या एकच अ‍ॅपद्वारे प्रवासी आपली यात्रा व्यवस्थितपणे प्लॅन करू शकतात. असं फडणवीस यावेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Political news: शरद पवारांच्या आमदाराने दिड महिन्यातच राजीनामा दिला, पण मोठा ट्वीस्ट

सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न  होते. त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या अ‍ॅपद्वारे प्रवास करणाऱ्या व्यक्तीला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे त्याच्या जवळ असणारे स्टेशन किंवा कोणती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कळू शकेल. तसेच वाहतुकीचे सुलभीकरण होऊन प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून टॅक्सी आणि इतर सेवांसोबत या प्रणालीचे एकत्रिकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं. लवकरच हे अ‍ॅप प्रवाशांच्या सेवेसाठी येणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Maratha Reservation:'मराठ्यांना कुणबी आरक्षण नको', नारायण राणेंच्या वक्तव्याने वाद पेटणार

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, मुंबईत सध्या 3,500 लोकल सेवा कार्यरत आहेत. येत्या काळात आणखी 300 लोकल सेवा सुरू करण्यासाठी ₹17,107 कोटींची गुंतवणूक रेल्वेकडून करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांमध्ये ₹1.70 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे, त्यांनी याप्रंसंगी स्पष्ट केले. यावेळी महामुंबई मेट्रो, मध्य तसेच पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com