जाहिरात

Political news: शरद पवारांच्या आमदाराने दिड महिन्यातच राजीनामा दिला, पण मोठा ट्वीस्ट

मारकडवाडी घटनेनंतर आता माळशिरस तालुक्यातील धानोरे गावातील बाराशे लोकांनी ईव्हीएम विरोधात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

Political news: शरद पवारांच्या आमदाराने दिड महिन्यातच राजीनामा दिला, पण मोठा ट्वीस्ट
सोलापूर:

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याता निर्णय घेतला आहे. ते आपला राजीनामा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देणार आहे. विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदार संघात घोळ झाल्याचा त्यांचा आरोप आहे. या मतदार संघात बॅलेटपेपरवर फेर निवडणूक घ्यावी या मागणीसाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा राजीनामा ते केंद्रीय निवडणूक आयोगाला देणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत. ते माळशिरस मतदार संघातून विजयी झाले आहे. मात्र ते विजयी जरी झाले असले तरी निसटत्या मताधिक्याने ते विधानसभेत पोहोचले. आपण एक लाखा पेक्षा जास्त मतांनी विजयी होणार होतो असा त्यांना विश्वास होता. त्यामुळेच मतदानात घोळ झाल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळेच बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे. यासाठी निवडणूक आयोगाकडे आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Maratha Reservation:'मराठ्यांना कुणबी आरक्षण नको', नारायण राणेंच्या वक्तव्याने वाद पेटणार

याच बरोबर दिल्लीच्या  जंतर-मंतरवर आंदोलन देखील करणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मारकडवाडी घटनेनंतर आता माळशिरस तालुक्यातील धानोरे गावातील बाराशे लोकांनी ईव्हीएम विरोधात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे आपण आपला राजीनामा देणार आहोत. माळशिरस मतदारसंघाची पोटनिवडणूक घ्या. अशी मागणी आमदार उत्तम जानकर करत आहेत.जे दोनचार हजाराने पराभूत होणार होते ते एक -दोन लाखाने निवडून आले. माझ्या सारखा उमेदवार लाखाने निवडून येणार होता तो काठावर निवडून आलेला दिसतो. असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Svamitva Yojana : "मालमत्तेचे अधिकार 21 व्या शतकातील मोठे आव्हान" : PM नरेंद्र मोदी

उत्तम जानकर यांनी राजीनामा देण्याचं जरी ठरवलं असलं तरी त्यांनी हा राजीनामा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिला आहे. जर त्यांना राजीनामा द्यायचाच असेल तर तो विधानसभा अध्यक्षांकडे द्यायचा होता. केंद्रीय निवडणूक आयोगाला त्यांचा राजीनामा स्विकारण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे जानकर हा केवळ स्टंट करत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय राजीनामा द्यायचा असेल तर आधी मला विचारा असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या आधीच सांगितलं आहे.