जाहिरात

Pune Firing CCTV: पुण्यात भरदिवसा गोळीबार! सलूनमध्ये घुसून 6 जणांचा अंदाधुंद गोळीबार, वारजेत गँगवॉरने खळबळ

Pune Gang War Firing Case: पुण्यातील वारजे भागात जुन्या वादातून भरदिवसा गँगवॉर. सलूनमध्ये घुसून दोन तरुणांवर गोळीबार, दोघांना अटक तर चार जण फरार. गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद.

Pune Firing CCTV: पुण्यात भरदिवसा गोळीबार! सलूनमध्ये घुसून 6 जणांचा अंदाधुंद गोळीबार, वारजेत गँगवॉरने खळबळ
"Pune News: पुणे भरदिवसा गोळीबाराने हादरले"
NDTV Marathi

- अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी

Pune Gang War Firing Case: पुणे शहरातील वारजे परिसरातून गँगवॉरची घटना समोर आली आहे. येथे भरदिवसा एका सलूनमध्ये घुसून अज्ञातांनी अंधाधुंद गोळीबार केला. वारजे भागातील यशदीप चौकात घडलेल्या या घटनेत दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण थरारक घटना सलूनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून चार जण फरार आहेत. जुन्या वादातून ही टोळीयुद्धसदृश घटना घडल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

वारजे भागात दहशतीचे वातावरण

शुक्रवारी (24 एप्रिल) संध्याकाळी यशदीप चौकातील एका सलूनमध्ये ही घटना घडली. सहा हल्लेखोर सलूनमध्ये पोहोचले आणि त्यांनी दोन तरुणांवर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली, दुसरीकडे सलूनमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला.

दोन तरुण जखमी, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

या हल्ल्यात निहाल शिंदे आणि अमोल आढाव हे दोन तरुण जखमी झाले आहेत. हे दोघेही केस कापण्यासाठी सलूनमध्ये आले होते. पण गोळीबारात ते जखमी झाले, त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

(नक्की वाचा: Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्पाला बुस्टर डोस! सरकारने तिजोरी उघडली, शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी थेट..)

दोघे अटकेत, चौघांचा शोध सुरू

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रीतम ठोंबरे आणि साहिल राऊत या दोन आरोपींना घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आली आहे. पण अन्य चार आरोपी अद्याप फरार असून त्यांच्याकडे आणखी एक पिस्तूल असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फरार आरोपींच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी तीन विशेष पथके रवाना केली आहेत.

पुण्यातील गोळीबाराचा व्हिडीओ

जुन्या वादातून हल्ला

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा हल्ला जुन्या वादातून झाला आहे. विशेष म्हणजे हल्लेखोर आणि जखमी तरुण हे सर्वजण पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत, परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com