जाहिरात

Gold Rate Today: सोन्याच्या दरात एका दिवसात 8 हजार रुपयांची घसरण; चेक करा नवे दर

Gold Rate: जळगाव सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरात ऐतिहासिक घसरण झाली आहे. 24 तासात सोन्याचे दर 8 हजार तर चांदी 20 हजारांनी स्वस्त झाली असून, 23 दिवसांत सोन्याने 35 हजार तर चांदीने 85 हजारांची मोठी आपटी खाल्ली आहे.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात एका दिवसात 8 हजार रुपयांची घसरण; चेक करा नवे दर

मंगेश जोशी, जळगाव

Gold Rate Today: सुवर्णनगरी जळगाव मधून सोन्या-चांदीच्या दराबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक बातमी समोर येत आहे. गेल्या चार दशकांतील घसरणीचे सर्व विक्रम मोडत सोन्या-चांदीच्या किमती अक्षरशः कोसळल्या आहेत. 

जागतिक घडामोडी आणि युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्ण बाजारावर झाला आहे. गेल्या चार दशकात पाहायला मिळाली नाही, अशी मोठी घसरण गेल्या 23 दिवसांपासून सुरू आहे. इतिहासात पहिल्यांदाच सलग 23 दिवस सोन्या-चांदीचे भाव खाली येत आहेत.

दरातील ऐतिहासिक बदल (1 मार्च ते 23 मार्च 2026)

मार्च महिन्याच्या सुरुवातीला 1 मार्च रोजी सोन्याचा दर प्रति तोळे 1,70,500 रुपये इतका होता. तोच दर आज 23 मार्च रोजी 1,36,000 रुपये प्रति तोळ्यांवर आला आहे. म्हणजे सोन्याच्या दरात मागील 23 दिवसात 34,500 रुपयांचा घसरण झाली आहे. 

तर चांदीच्या दरातही मागील 23 दिवसा 85,000 रुपयांच्या घसरणीची नोंद झाली आहे.  1 मार्च रोजी चांदीचा दर प्रति किती 2,95,000 रुपये इतका होता. तोच दर आज 23 मार्च रोजी 2,10,000 रुपये प्रति किलोवर आला आहे.

(नक्की वाचा-  Satara ZP Election: "गळचेपी होत असेल तर राजीनामा देऊ", शिवसेनेचे मंत्री आक्रमक; एकनाथ शिंदेंकडे मांडली भूमिका)

24 तासांतील मोठी पडझड

केवळ गेल्या 24 तासांचा विचार केला, तर सोन्या-चांदीच्या किमतीत झालेली घसरण थक्क करणारी आहे. सोने एका दिवसात 8000 रुपयांनी तर चांदी एका दिवसात तब्बल 20 हजार रुपयांनी घसरली आहे. 

तज्ज्ञांचे मत आणि परिणाम

लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरात अचानक मोठी घट झाल्याने सुवर्ण व्यापारी आणि ज्यांनी चढ्या दरात गुंतवणूक केली होती, अशा गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. सोन्याच्या दरातील या अस्थिरतेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावरही परिणाम होण्याची शक्यता सोने तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; मविआ सरकारही भोंदूबाबावर मेहेरबान असल्याचे समोर)

घसरणीचे कारण काय?

मध्यपूर्वेतील आणि जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या जागतिक मागणीत आणि पुरवठ्यात मोठे फेरबदल झाले आहेत. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्या जागतिक बँकांनी आपली धोरणे बदलल्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com