Raigad News: नॅपकिनवरून राजकारण पेटलं, तटकरेंना थेट वेटर म्हटलं, गोगावलेंची आरपारची भाषा

फलोत्पादन रोजगार व खारभूमी मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसा निमित्त महाडमध्ये सभेचे आयोजन केले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
रायगड:

सुनिल तटकरे विरुद्ध भरत गोगावले यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. तटकरेंनी आधी भरत गोगावले यांची नक्कल करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी गोगावलेंच्या नॅपकिन घेण्याची नक्कील केली. यावरून गोगावले यांनी आता तटकरेंना सुनावल आहे. आपण खांद्यावर टाकून असा कधी रुमाल घेत नाही, असा रुमाल हॉटेलचे वेटर घेतात, असं म्हणत त्यांनी एक प्रकरे तटकरेंचा उल्लेख वेटर असा केला. शिवाय आमचा रुमाल हृदयाच्या जवळ असतो. जिथे गोरगरिबांचे आशीर्वाद असतात, असा टोला ही त्यांनी तटकरेंना लगावला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

फलोत्पादन रोजगार व खारभूमी मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसा निमित्त महाडमध्ये सभेचे आयोजन केले होते. महाडच्या चांदे मैदानातील ही सभा झाली. काही दिवसापूर्वी याच महाडच्या चांदे मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली होती. या सभेत महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी पक्षप्रवेश केला होता. यावेळी सुनील तटकरे यांनी नॅपकिन हातात घेऊन तो खांद्यावर टाकण्याची स्टाईल केली. शिवाय व्यासपीठ आणि कार्यकर्त्यांना नमस्कार केला.असे करून त्यांनी भरत गोगावले यांची स्टाईल मारली होती. 

ट्रेंडिंग बातमी - Sanjay Raut News: 'दत्तक नाशिकचे अनाथाश्रम केलं...', संजय राऊतांचा CM फडणवीसांवर निशाणा

त्यालाच गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी भरत गोगावले यांनी नॅपकिन फिरवत, तो खांद्यावर टाकला. तटकरे यांनी खांद्यावर जसा  नॅपकिन टाकला होता तसा हॉटेलचे वेटर लोक टाकतात. आम्ही तो नॅपकिन काखेत घेतो. हृदयाच्या जवळ ठेवतो. जिथे गोरगरिबांचे आशीर्वाद असतात. सुनील तटकरे यांचं नाव न घेता गोगावले यांनी तटकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. गोगावले यांनी घेतलेल्या या भूमीके मुळे तटकरे विरुद्ध गोगावले हा वाद आणखी चिखळण्याची दाट शक्यत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Dhule News : जमिनीवर आपटलं नंतर जमिनीत पुरलं; आईसमोरच दीड वर्षांच्या चिमुकल्याला सावत्र बापाने संपवलं

गोगावले यांनी महायुती असा उल्लेख न करता युती असा उल्लेख केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता तटकरे वगळून असं ही त्यांनी संकेत दिले. आपण लोकसभेला रक्ताचे पाणी करून तटकरेंना विजयी केले असा दावाही त्यांनी यावेळी केला. पण यापुढे काय करावे लागेल त्याचा निर्णय घ्यावा लागेल असं सांगितल त्यांनी एक प्रकार इशाराच दिला आहे. शिवाय महाडमध्ये कमी मताधिक्य मिळालं, असं विचारलं जातं, मग आदिती तटकरेंच्या मतदार संघात ही कमी मताधिक्य कसं मिळालं असा प्रश्न गोगावले यांनी केला आहे. 

Advertisement