Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींचा मे महिन्याचा हाफ्ता कधी मिळणार? अजित पवारांनी दिली मोठी माहिती

लाडक्या बहीणींना अजूनही मे महिन्याचा हफ्ता मिळालेला नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins

महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यानुसार प्रत्येक पात्र महिलेला दिड हजार रुपये महिन्यासा दिले जातात. मात्र निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक महिन्याची हफ्ता जमा होण्याची तारीख पुढे पुढे जात आहेत. त्यामुळे महिलांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. अशा स्थितीत त्यांना हफ्ता जमा होण्याची वाट पाहावी लागते. अनेक वेळा तर बँकांचे हेलपाटेही मारावे लागत आहेत. त्यात ही जर पैसे जमा झाले नसतील तर मनस्ताप होतो तो वेगळाच. मे महिना संपत आला आहे. तरी या महिन्याचा लाडक्या बहीणींचा हफ्ता काही जमा झालेला नाही. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लाडक्या बहीणींना अजूनही मे महिन्याचा हफ्ता मिळालेला  नाही. त्यात आता अजित पवारांनी लाडक्या बहीणींना मे महीन्याचा हाफ्ता कधी मिळेल याचे संकेत दिले आहेत. अजित पवारांनी सांगितले की आजच पावणे चार हजार कोटींच्या फाईल मी सही केली आहे. त्यामुळे मे महिन्याचे लाडक्या बहीणींचे पैसे आता मिळतील. शिवाय आदिती तटकरे यांना सांगितले की लाडक्या बहीणींचे पैसे आता लवकर मिळतील. त्यांच्या फाईलवर सही केली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. वीस मे नंतर ही प्रक्रीया सुरू होईल. पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Jyoti Malhotra: 'पाकिस्तानबद्दल जेवढे बोलू तेवढे कमीच...', ज्योतीच्या पर्सनल डायरीने उलगडले अनेक राज

दरम्यान प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एका मटका माफीयाला पक्षात प्रवेश दिला होता. त्यावर ही अजित पवारांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ज्या व्यक्तीला प्रवेश देण्यात आला, तो प्रवेश देण्याच्या योग्यतेचा नव्हता. त्यामुळे त्याची तातडीने पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाची बदनामी होईल अशा व्यक्तींनी पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. प्रवेश देण्या आधी त्या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासून पाहा. योग्य लोकांना प्रवेश द्या असं ही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pakistan Spy: ज्योती मल्होत्रा, 12 गुप्तहेर अन् 12 प्रश्न, पाकिस्तानने नेमकं कुणाला हेरलं?

मी कामाचा माणूस आहे. मी कडक आहे, मला काही गोष्टी खपत नाही. मी सकाळी 5 ला उठून कामाला लागतो. काही जण पाच हजाराचा हार घालतात आणि पाच कोटीचं काम पुढे करतात. त्यांना वाटतं मला हार घातल्याने मी खूश होईन असं ही ते म्हणाले.  संघटना चालवताना बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, जबाबदारी देऊन विश्वास ठेवावा लागतो असं ही ते म्हणाले. आपण सगळे एकाच विचारधारेचे लोक आहोत. तुमची आणि आमची विचार धारा वेगळी असं नाही. सर्वधर्म समभाव हीच आपली विचारधारा आणि शिकवण आहे. काहींच्या पोटात एक आणि ओठावर एक असं असतं. आपला राष्ट्रवादी काँग्रेसचं तसं नाही असे ही ते यावेळी म्हणाले. बीड दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांबरोबर बोलत होते. 

Advertisement

Topics mentioned in this article