जाहिरात

Jyoti Malhotra: 'पाकिस्तानबद्दल जेवढे बोलू तेवढे कमीच...', ज्योतीच्या पर्सनल डायरीने उलगडले अनेक राज

हिसारची रहिवासी असलेली 33 वर्षीय ज्योती मल्होत्रा 'ट्रॅव्हल विथ जो' (Travel With Joe) नावाचे एक यूट्यूब चॅनल चालवते.

Jyoti Malhotra: 'पाकिस्तानबद्दल जेवढे बोलू तेवढे कमीच...', ज्योतीच्या पर्सनल डायरीने उलगडले अनेक राज
नवी दिल्ली:

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणामधील यूट्यूबर ज्योती मल्होत्राची एनआयए (NIA), आयबी (IB) आणि सैन्य गुप्तचर अधिकारी चौकशी करत आहेत. ज्योती मल्होत्राच्या आर्थिक व्यवहारांची आणि प्रवासाच्या तपशिलांचीही तपासणी केली जात आहे. दरम्यान, तपास यंत्रणांच्या हाती एक महत्वाचा पुरावा लागला आहे. हा पुरावा म्हणजे ज्योती मल्होत्राची पर्सनल डायरी. या डायरीत तिने पाकिस्तानबद्दल काही गोष्टी लिहील्या आहेत. ते आता समोर आले आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

2012 चं कॅलेंडर असलेल्या या जुन्या डायरीच्या पानांवर ज्योतीने आपल्या मनातील भावना लिहिल्या आहेत. पाकिस्तान प्रवासादरम्यान गोळा केलेली माहिती, प्रवासाला जाण्यापासून ते परत येण्यापर्यंतचे तिचे जे काही अनुभव आले, ते तिने या डायरीत शेअर केले आहेत. त्यात ती पाकिस्तानमधून भारात आल्यानंतर लिहीते,  "पाकिस्तानमधून 10 दिवसांचा प्रवास करून आज भारतात, आपल्या देशात परतले आहे. या काळात पाकिस्तानच्या जनतेकडून खूप प्रेम मिळाले. आपले सबस्क्रायबर्स, मित्रही आम्हाला भेटायला आले. लाहोर फिरण्यासाठी मिळालेला दोन दिवसांचा वेळ खूप कमी होता." असं तिने या डायरित लिहीलं आहे. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Pakistan Spy: ज्योती मल्होत्रा, 12 गुप्तहेर अन् 12 प्रश्न, पाकिस्तानने नेमकं कुणाला हेरलं?

तिने पुढे लिहिते, "सीमेचे अंतर किती काळ कायम राहील हे माहित नाही. पण मनातील तक्रारी दूर होतील. आपण सर्व एकाच धरतीचे, एकाच मातीचे आहोत. जर काही असे असेल जे व्हिडिओमध्ये शेअर केले नसेल, तर तुम्ही निःसंकोचपणे कमेंटमध्ये विचारू शकता. आता परवानगी द्या, पाकिस्तानची सरहद्द इथेच संपली." ज्योती पुढे लिहीते  "विनंती आहे की पाकिस्तान सरकारने भारतीयांसाठी पाकिस्तानातील गुरुद्वारे आणि मंदिरांचा रस्ता खुला करावा. हिंदूंनाही तिथे भेट देता यावी. यासाठी पुढाकार घ्यावा. तिथल्या मंदिरांचेही संरक्षण करावे. 1947 च्या वेळी कुटुंबापासून दुरावलेल्यांना भेटता यावे. पाकिस्तानबद्दल जेवढे बोलू तेवढे कमीच. क्रेझी आणि कलरफुल." असं तिने पाकिस्तानचं वर्णन केलं आहे. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - पाकिस्तानच्या गुप्तहेरांचे धक्कादायक जबाब, 'असे' अडकले दानिशच्या जाळ्यात

हिसारची रहिवासी असलेली 33 वर्षीय ज्योती मल्होत्रा 'ट्रॅव्हल विथ जो' (Travel With Joe) नावाचे एक यूट्यूब चॅनल चालवते. तिला 16 मे रोजी न्यू अग्रसेन एक्स्टेंशनमधून अटक करण्यात आली होती. ज्योतीविरुद्ध अधिकृत गोपनीयता अधिनियम आणि भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्यांत पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या 12 व्यक्तींमध्ये ज्योतीचा समावेश आहे. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Weight loss tips: 24 वर्षाच्या तरुणीनं 6 महिन्यांत 40 किलो वजन घटवलं, वेट लॉसचा भन्नाट डाएट प्लॅन

पोलीस ज्योतीच्या पाकिस्तान आणि चीन प्रवासाची चौकशी करत आहेत.  हिसारमधील हरियाणा पोलिसाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, केंद्रीय एजन्सीज आणि सैन्य गुप्तचर अधिकारीही ज्योती मल्होत्राच्या प्रवासाच्या तपशिलांची चौकशी करत आहेत. कारण तिने पाकिस्तान, चीन आणि इतर काही देशांचा प्रवास केला होता. त्यातून काही हाती लागते का त्याचा प्रयत्न केला जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com