
लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची यशस्वी झालेली योजना आहे. ही योजना सुपरहीट झाली. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला. ज्या पद्धतीने ही योजयना सुपरहीट झाली, त्याच पद्धतीने महायुतीलाही बंपर यश मिळालं. निवडणूक निकालानंतर मात्र सरकारने या योजनेबाबत काही निर्णय घेतले आहे. या योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे विकासकामांवरही आणि अन्य योजनांनाही त्याचा फटका बसत आहे. अशा वेळी सरकारने लाडक्या बहीणांची पडताळणी सुरू केली आहे. काही निकष ही लावले आहे. त्यामुळे अनेक नावं ही वगळली जात आहे. अशा स्थितीत आता विरोधकांना आक्रमक भूमीका घेतली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लाडक्या बहिणींची नावं कापल्यास, तुम्ही मतांसाठी महिलांना लाच दिली, हे सिद्ध होईल. पण आम्ही नावं कापू देणार नाही. सरकारने लाडक्या बहिणींची नावं कापली, तर आम्ही या भगिनींना घेऊन मंत्रालयात घुसू. त्यांना केबिनमध्ये बसवू आणि मंत्र्यांचं जीणं मुश्किल करून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. जितेंद्र आव्हाड अंबरनाथमध्ये महिलांच्या हळदी कुंकू समारंभासाठी आले होते. यावेळी महिलांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला.
ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...
आम्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहोत. तुमची नावं जर सरकारनं या योजनेतून कापली, तर लाडक्या बहिणींना घेऊन मंत्रालयात घुसू, असं ही ते यावेळी म्हणाले. या योजनेतील अनेक महिलांची नावे सध्या कापली जात आहेत. अनेक महिलांना वगळलं जात आहे. ही योजना म्हणजे सरकारला अडचणीचे ठरत आहे. असं असलं तरी सर्वांची सरसकट नावं कापली जाणार नाहीत असं सरकारकडून सांगितलं जात आहे. पण जितकी नावं कट होतील तितका फायदा हा सरकारला होणार आहे. त्यामुळे यावर युद्धपातळीवर काम केलं जात आहे.
आता नाव कट करण्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सरकार समोरील अडचण वाढणार आहे. जर नाव कट करायची होती तर ऐवढ्या घाईने या योजनेचे पैसे महिलांना का देण्यात आले असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याच वेळी योग्य पडताळणी का केली नाही? या मागे निवडणूक जिंकण्याची रणनिती होती का? या सारखे प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना दर महीन्याला दिड हजार रुपये दिले जात आहे. यात वाढ करून 1800 रुपये दरमहा देण्याचे आश्वासन निवडणुकीत महायुतीने दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world