राज्यात लोकसभा निवडणुकीत यश मिळालेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला. मविआला राज्यातील 288 पैकी फक्त 56 जागांवर विजय मिळवता आला. मविआमधील तीन्ही प्रमुख पक्षांची जोरदार पिछेहाट झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 20, काँग्रेसला 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 10 जागांवर समाधान मानावं लागलं. या मोठ्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील मतभेत उघड झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी या पराभवानंतर काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसमध्ये अतिआत्मविश्वास निर्माण झाला होता. काँग्रेसचे लोकं कोणते खाते मिळतील, कोण मुख्यमंत्री होईल, यासाठी उत्सुक होती. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचं नावं घेतलं असतं तर अधिक फायदा झाला असता, असा दावा त्यांनी केला.
( नक्की वाचा : Exclusive : राज्यात सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला, कसं असेल संभाव्य मंत्रिमंडळ? )
शिवसैनिकांनी 288 मतदारसंघात सक्रीय झाले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होतील हे माहिती नाही. मुंबई आणि स्थानिक स्वराज्य संस्था याबाबत परिस्थिती स्थानिक राजकारण वेगवेगळ्या प्रकारचे असते. स्थानिक स्तरावर याबात चर्चा होईल, असं दानवेंनी स्पष्ट केलं. दानवेंच्या या वक्तव्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्र राहिलेली महाविकास आघाडी स्थािक स्वराज्य संस्थांची निवडणूक एकत्र लढणार का? हा प्रश्न निर्माण झालाय.
ठाकरे बंधू एकत्र येणार?
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाप्रमाणेच राज ठाकरेंच्या मनसेलाही मोठा फटका बसला. मनसेला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही. या पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. पण, अंबादास दानवे यांनी ही शक्यता फेटाळली आहे. ठाकरे बंधू एकत्र येणे आता शक्य नाही. याबाबत चर्चा झालेली नाही. विधानसभा निवडणुकीत मनसे कुणाविरुद्ध होती हेच स्पष्ट नव्हते. भूमिका स्पष्ट नसल्यानं सैन्यानं नेमतं काय करायचं याबाबत संभ्रम होत, असं मत दानवे यांनी व्यक्त केलं.