छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) गेल्या 36 वर्षांत एकाही प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा (Death Sentence) सुनावण्यात आली नव्हती. मात्र एका खुनाच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीने केलेले कृत्य हे क्रूर, भयंकर असल्याचे म्हणत हा गुन्हा रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजेच दुर्मिळ असल्याचे म्हणत फाशीची शिक्षा सुनावली. पंचराम गेंद्रे असं आरोपीचे नाव असून तो 36 वर्षांचा आहे.
नक्की वाचा :दारु पिऊन लग्नात गेला अन् रस्ता चुकला; लोकांनी खांबाला बांधून धू धू धुतलं
नामचीन गुंड असलेल्या पंचरामवर 4 वर्षांच्या मुलाला जाळून ठार मारल्याचा आरोप होता. न्यायालयामध्ये त्याच्याविरोधातील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याच्या शिक्षेवरील युक्तिवाद झाला. सरकारी वकिलांनी हा गुन्हा दुर्मिळ असल्याचे न्यायालयासमोर सिद्ध केले आणि पंचरामला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पंचरामला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. जर आरोपीला दया दाखवली तर गुन्हेगारांचे मनोबल वाढेल आणि त्यांच्या मनातील न्यायाचा धाक संपेल असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
नक्की वाचा - बंद खोलीत पायलट तरुणीचा मृतदेह, बॉयफ्रेंडला अटक; अंधेरीत काय घडलं?
प्रकरण काय आहे ?
सदर गुन्हा 2 वर्षांपूर्वी म्हणजेच 2022 साली घडला होता. 5 एप्रिल 2022 रोजी 4 वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. त्याच्या घरच्यांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. तक्रारदारांनी म्हटले की पंचराम हा बेपत्ता मुलगा आणि त्याचा 10 वर्षांचा मोठा भाऊ अशा दोघांना बाईकवरून फिरायला घेऊन गेला होता. पंचरामने मोठ्या भावाला सोडून दिले.
नक्की वाचा :क्रुरतेचा कळस! शेजाऱ्याकडून 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार; खळबळजनक घटना
पोलिसांना तपासादरम्यान कळाले की पंचरामने लहान मुलाचे अपहरण करून त्याला स्मशानात नेले होते. तिथे पंचरामने एक टॉवेल पेट्रोलमध्ये भिजवला आणि लहान मुलाभोवती गुंडाळला होता. यानंतर पंचरामने या मुलाला जाळून ठार मारले होते. तपासादरम्यान हे देखील कळाले की पंचरामने मृत मुलाच्या आईवर एकतर्फी प्रेम होते. मुलाची आई पंचरामकडे सातत्याने दुर्लक्ष करत होती. याचा राग आल्याने पंचरामने तिच्या मुलाला ठार मारायचं ठरवलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world