जाहिरात
Story ProgressBack

तुमचा दुधाने अभिषेक करायचा आहे! उद्धव ठाकरेंना मनसैनिकाचे पत्र

Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका मनसैनिकाने लिहिले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मनसैनिकाने पत्रामध्ये उद्धव ठाकरे यांना "तुमचा दुधाने अभिषेक करायचा आहे", असे का म्हटले? वाचा सविस्तर...

Read Time: 2 min
तुमचा दुधाने अभिषेक करायचा आहे! उद्धव ठाकरेंना मनसैनिकाचे पत्र

Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका मनसैनिकाने लिहिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्राद्वारे मनसैनिकांने उद्धव ठाकरे यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी पत्र लिहून उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. तसेच त्यांनी हे पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  'X' वरही शेअर केले आहे. "कधीही आपल्या राजकीय भूमिकांमध्ये बदल न केल्याबद्दल आपला दुधाने अभिषेक करण्यास वेळ मिळावा", असे म्हणत काळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे.   

 
मनसैनिकाने पत्रामध्ये नेमके काय म्हटले आहे? 

महोदय,
सस्नेह जय महाराष्ट्र !!!
आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे आपण शिवसेनेची धुरा हातात घेतल्यापासून (माफ करा आत्ताचा आपला उबाठा गट) कधीही सेनेच्या भूमिकेला छेद देऊन राजकारण केलेले नाही. मंत्रीपद, सत्ता, मुख्यमंत्री पद (स्वतःला) यासाठी आपण कधी भाजपा बरोबर युती केली तर कधी युती तोडली. नंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आपण सेनेचे पारंपरिक शत्रू असलेले आणि संपूर्णपणे विरोधी विचारधारा असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी (म्हणजे आत्ताचा शरद पवार गट) बरोबर आघाडी केलीत. मात्र सेनेला मुख्यमंत्री पद मिळवून दिलेच. हा भाग वेगळा की आपण एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतातय पण माफ करा आम्ही विसरलोच की आपणही एक शिवसैनिकच आहात. हे सगळे आपण केलेत यास कुठेही यू टर्न, तडजोडीचे, सत्तापिपासू, स्वार्थी, मतलबी राजकारण अथवा भूमिका बदलणे असे म्हणता येत नाही. याबद्दल आपले करावे तितके कौतुक कमीच आहे...!!!!

आपल्यासारखा इतका सच्चा, प्रामाणिक, तत्वनिष्ठ, सज्जन, साधा, भोळा आणि सत्तेचा अजिबात मोह नसलेला व्यक्ती आजच्या राजकारणातच काय तर या पृथ्वीतलावर सापडणे दुर्मिळ. याच आपल्या गुणांसाठी, तुमचे महाराष्ट्रावर असलेले ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता म्हणून आम्ही समस्त महाराष्ट्राच्यावतीने आपला दुधाने अभिषेक करू इच्छितो (जसा नायक सिनेमात अनिल कपूरचा केला गेला होता) तरी आपण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना यासाठी आपली वेळ द्यावी, ही नम्र विनंती...!!!

आपला नम्र,
गजानन काळे | महाराष्ट्र सैनिक

टीप - निवडणुकांच्या आपल्या व्यस्त दिनक्रमात आपण वेळ न देऊ शकल्यास आपल्या फोटोला आम्ही दुधाने अभिषेक घालून समस्त महाराष्ट्राची इच्छा पूर्ण करुच...!!!

आणखी वाचा

वाद पेटला! अजित पवार गटाचे हे मंत्री विजय वडेट्टीवारांबाबत करणार मोठा गौप्यस्फोट 

कन्हैया कुमार लोकसभेच्या रिंगणात, काँग्रेसकडून भाजपच्या 'या' खासदाराला देणार आव्हान

पालघर युवा मेळाव्यात उद्धव ठाकरे टार्गेटवर, साधूंच्या हत्येप्रकरणात पूर्वेश सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination