मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका पॉडकास्टला दिलेली मुलाखत आणि त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेली प्रतिक्रिया यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा सुरु झाली आहे. या विषयावर कालच आमचं उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली होती, असं सूचक वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे या एकत्रिकरणाबाबत उद्धव ठाकरे गटानं पुढाकार घेकला आहे का? ही चर्चा सुरु झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले राऊत?
हे दोघंही ठाकरे आहेत, आणि त्यांच नातं आजही कायम आहे, असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. राज ठाकरे यांचं वक्तव्य मी आणि उद्धव ठाकरे यांनी ऐकलं. त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी भूमिका मांडली आहे. त्यामुळे वाद मिटायला वेळ लागणार नाही असं राऊत यांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या मूळावर जे उठले आहेत त्यांना पाठिंबा देऊ नका असंच उद्धव ठाकरे यांचं लोकसभा निवडणुकीच्या वेळी मत आहे, असं राऊत म्हणाले.
( नक्की वाचा : Uddhav-Raj Thackeray News : "भांडण बाजूला ठेवायला तयार!", उद्धव ठाकरेंची अटींसह राज यांच्यासोबत यायला तयारी )
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या यांना एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. या विषयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. आमची लोकसभेला भूमिका ठाम होती. इथे येण्याआधी उद्धव ठाकरेंसोबत मी चर्चा केली. आम्ही हवेत चर्चा करत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मराठी संस्कारवर कोणी घाव घालत असाल तर ते खपवून घेणार नाही. आम्ही वाट बघत आहोत. राज ठाकरेंकडून समोरून बोलणं आलं तर आम्ही टाळणार नाही. राज ठाकरेंकडून ऑफर आली तर ती नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही, असं मोठं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.
सगळे ठाकरे एक आहेत. तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना घरात घेतलं त्यामुळे आम्ही वेगळे झालो. दोन ठाकरे एकत्र येणं ही लोकभावना आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यांनी त्यांच्या मन की बात सांगितली ती खरी असावी, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.