अमजद खान, प्रतिनिधी
KDMC Election 2026 Latest News : राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून येत्या 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच कल्याण-डोंबिवलीत महायुतीनं निवडणुकीआधीच विजयी गुलाल उधळला आहे. मतदानापूर्वीच महायुतीला मोठं यश मिळालं आहे. आज गुरुवारी महायुतीच्या भाजपचे 2 तर शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. हर्षला मोरे (शिवसेना),मंदा पाटील (भाजप),हर्षला मोरे (शिवसेना), विश्वनाथ राणे (शिवसेना),वृषाली जोशी (शिवसेना),रमेश म्हात्रे (शिवसेना),ज्योती पाटील (शिवसेना) अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत.
अर्ज मागे घेण्याचा पहिला दिवस अन् घडलं..
कल्याण-डोंबिवलीच्या महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज मागे घेण्याचा पहिला दिवस होता. याचदिवशी भाजपचे 2 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना,मनसे आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या बिनविरोध विजयामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नक्की वाचा >> Pune News : अन् पूजा मोरे पत्रकार परिषदेत ढसाढसा रडल्या, म्हणाल्या, "राजकारण घाणेरडं..पण माझ्या बापाने.."
कोणत्या प्रभागात कोण उमेदवार निवडून आले?
प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी,26 अ मधून आसावरी नवरे,26 ब मधून रंजना पेणकर,27 अ मधून मंदा पाटील,24 अ मधून ज्योती पाटील,हे भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.दुसरीकडे शिंदे गटाचे 4 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहे.यामध्ये 28 अ मधून आमदार राजेश मोरे यांचे पुत्र हर्षल मोरे हे बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्रमांक 24 मधून शिंदे गटाचे रमेश म्हात्रे, वृषाली जोशी आणि विश्वनाथ राणे बिनविरोध निवडून आले. यामध्ये तीन ठिकाणी भाजप उमेदवारांसमोर एकही उमेदवारी अर्ज दाखल नव्हता. उर्वरीत 6 जांगावर विरोधी पक्षांतील उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे.