मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर त्यांचा हा दौरा होत आहे. या दौऱ्यात ते निवडणूक तयारी संदर्भात आढावा घेत आहेत. इच्छुक उमेदवारांना भेटत आहेत. त्यांच्या मुलाकती ही घेत आहेत. काही ठिकाणी तर त्यांनी उमेदवारही जाहीर केले. मात्र या दौऱ्याच्या सुरूवातीलाच त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय असा प्रश्न केला होता. त्यानंतर त्यांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. धाराशीवमध्ये त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर ते नांदेडमध्ये आले असता त्यांना अशाच घोषणाबाजीला सामोर जावे लागले.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लातूरमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर ते नांदेडकडे रवाना झाले. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव त्यांनी तिथे राहणे टाळले. ते खाजगी हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेले. राज ठाकरे नांदेडच्या विश्रामगृहात येणार असल्याचे मराठा आंदोलकांना समजले होते. त्यामुळे ते तिथे जमा झाले होते. राज ठाकरे जेव्हा तिथून निघाले त्यावेळी या आंदोलकांनी राज यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. राज ठाकरे यांचा ताफा तिथून निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.
ट्रेंडिंग बातमी - तो भिंतीवरून आला, तिला गच्चीवर घेवून गेला, हातपाय बांधले अन् पुढे...
राज ठाकरे यांना आम्ही घाबरणारे नाही. त्यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही असे मराठा आंदोलक तरूणाने यावेळी ठणकावून सांगितले. जरांगे पाटील हे प्रामाणिक पणे मराठा समाजासाठी लढत आहेत. अशा वेळी राज ठाकरे जर खरे असते तर त्यांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला असता. पण त्यांनी तसे केले नाही. उलट ते मराठा आरक्षणा विरोधात बोलत आहेत. त्यांनी स्वत: राजकारणासाठी घरातही राजकारण केलं असा आरोपही यावेळी मराठा आंदोलकांनी केला.
ट्रेंडिंग बातमी - 'लाडकी बहीण'नंतर आता 'लाडकी मोलकरीण' योजना; शिंदे सरकार मोठ्या घोषणेच्या तयारीत?
महाराष्ट्रातील मुला मुलींचे भवितव्य घडलं पाहीजे. खाजगी क्षेत्रात कुठे आरक्षण आहे. आरक्षणाचे नेमके होते काय याचा कोणी विचार करणार आहे का? मतांच्या राजकारणासाठी सध्या आरक्षणाचा मुद्दा पेटवला जात आहे. कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून हा खेळ सुरू आहे असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. यातून त्यांनी अप्रत्यक्ष पणे मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world