फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; शिवाजी पार्कातून राज ठाकरेंची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील शेतकरी, तरुणांकडे लक्ष द्या, अशी मागणी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली. यावेळी राज ठाकरेंनी फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं.  

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्यातील मेळाव्याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं.आज शिवाजी पार्कात पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. अमित शहांची भेट, शिंदे गटासोबत एकत्र येऊन प्रमुखपदावरील चर्चा याबाबतची आपली भूमिका मांडली. यावेळी वृत्तवाहिन्यांकडून चालवणाऱ्या जाणाऱ्या बातम्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील शेतकरी, तरुणांकडे लक्ष द्या, अशी मागणी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली. विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरेंनी फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं.  

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे...

निवडणुकीची कामं डॉक्टर-नर्सेस का?
जवळपास पाच वर्षानंतर महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. महानगरपालिकेच्या निवडणूका आता होतील असं म्हणता अजूनही होत नाहीत. त्यामुळे 2019 ला ज्या निवडणुका झाला त्यानंतर आता निवडणुकात होत आहेत. त्यामुळे आता आचारसंहितावाले जागे झालेत. महानगरपालिकेच्या डॉक्टर आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामाला जुंपलं. डॉक्टर मतदारांची नाडी तपासणार का? ज्या रुग्णांसाठी नेमणूक केली आहे, त्यासाठी ते नसतील. निवडणुकीत आयोगाकडून समांतर फळी का तयार केली जात  नाही. ज्या डॉक्टर आणि नर्सेसकडे निवडणुकीची जबाबदारी दिली तरी त्यांनी जाऊ नये, कोण काय करतं ते मी पाहतो, असं म्हणज राज ठाकरे डॉक्टर आणि नर्सेसच्या पाठिशी उभे राहिले.

अमित शहांच्या भेटीदरम्यान काय घडलं?
अमित शाहांना दिल्लीला भेटायला गेलो होतो, त्यावरुन न्यूज चॅनलने काहीही बातम्या दाखवल्या. राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अशा बातम्या चालवल्या जात होत्या. मात्र मला शिवसेना प्रमुख व्हायचं असतं तर सुरुवातीलाच झालो असतो.  मात्र मला पक्ष फोडून काहीही करायचं नाही. मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यतिरिक्त मला कोणाच्या खाली काम करायचं नाही. अशा कोणत्याही गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका. मी जे अपत्य जन्माला घातलंय त्याचाच अध्यक्ष राहणार. मनसेला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. मी मनसेसोबत राहणार असल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

अमित शहांच्या भेटीदरम्यान जागा वाटपाची चर्चा झाली का?
1995 सालानंतर मी कधीच जागा वाटपाच्या चर्चेसाठी बसलो नाही. कारण माझी तशी वृत्तीच नाही, असं राज ठाकरे म्हणाले. भाजपकडून त्यांच्या चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती. मात्र मी कधीच कोणाच्याही चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, रेल्वे इंजिन नागरिकांच्या कष्टाने उभं राहिलं आहे. त्यामुळे चिन्हावर तडजोड करणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. 1980 साली बाळासाहेब इंदिरा गांधी आणि संजय गांधींना भेटायला गेले होते. अनेक जणं माझ्या घरी येऊन भेटतात. त्यात मोठेपणा किंवा कमीपणा कसला आला? 

Advertisement

राज ठाकरे हे अमित शाहांना भेटायला दिल्लीला का गेले?
गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन काहीतरी करावं अशी अपेक्षा व्यक्त करीत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. मात्र नेमकं काय करायचं हे सांगितलं जात नव्हतं. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी मी अमित शाहांनी भेट घेण्याचं ठरवलं असं राज म्हणाले. 

काँग्रेससोबत भेटी मात्र गाठी भाजपसोबत...
माझा संबंध भाजपमधील अनेक नेत्यांशी होता.  काँग्रेससोबत माझ्या भेटी होत असल्या तरी गाठी भाजप नेत्यांसोबत बांधल्या गेल्या. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासोबत माझे चांगले संबंध असल्याचे राज ठाकरेंनी सांगितलं. 

Advertisement

गुजरातचा विकास होतोय, पण महाराष्ट्र खूप पुढे...
देशात राज ठाकरे पहिली व्यक्ती होती, ज्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्या आधीपर्यंत भाजपमधीलही कोणत्याही नेत्याने असा उल्लेख केला नव्हता. मात्र 2014 च्या निवडणुकीनंतर नोटाबंदी, आणि बुलेट ट्रेन यासारख्या गोष्टी मला पटल्या नाहीत. त्यावेळी मी विरोध केला. मी एनआरसीचाही विरोध केला. मी कधीच वैयक्तिक टीका केली नाही. 

राज ठाकरेंनी घेतला उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांचा समाचार 
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका करतात, तशी मी कधीच केली नाही. मी मुख्यमंत्रिपदासाठी टीका केली नाही, माझ्या भूमिकेसाठी विरोध केला. महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय, कोणाच्या सोंगट्या कुठल्या भोकात काही कळत नाही. अशी महाराष्ट्राची स्थिती झाली आहे. यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.  

Advertisement
Topics mentioned in this article