विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रोजच शाब्दीक चकमकी होताना दिसत आहेत. एकमेकांवर टिका करण्याची संधी ते सोडत नाहीत.आता मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टिका केली आहे. थेट उद्धव ठाकरेंनाच श्रीकांत शिंदे यांनी लक्ष्य केल्याने हा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय झालं? याचा पाढाच या निमित्ताने शिंदे यांनी वाचला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात अडीच दिवस विधानभवनात जाण्याचा विक्रम केला आहे. अशी बोचरी टिका श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. ठाकरे यांनी स्वत:ला अडीच वर्षे बंद करून विक्रम केला. अडीच वर्षे घरात राहून इन्फ्रास्ट्रक्चरची कामे थांबवली. असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. पण आम्ही तळागाळात जाऊन विकास करण्याचा विक्रम केला आहे असा दावा शिंदे यांनी केला.
ट्रेंडिंग बातमी - मोठी बातमी : शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या बाबतीत महायुतीमधून समन्वयाने निर्णय होईल,असे ही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी जनसंवाद दौरा सुरू केला आहे. यावेळी त्यांनी लडकी बहीण योजनेची माहिती दिली. या योजनेमुळे महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे ते म्हणाले. ही योजना थांबावी यासाठी काँग्रेसचे प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे यांचा जनसंवाद दौरा सध्या सांगलीत सुरू आहे. त्यावेळी ते बोलत होते.
ट्रेंडिंग बातमी - मोठा निर्णय! शिवाजी महाराजांच्या सरदारांची वास्तू,वस्तू,समाधीचे जतन होणार
श्रीकांत शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. या आधीही उद्धव ठाकरे यांच्यावर अशाच पद्धतीने टिका झाली होती. ठाकरे यांनी अडीच वर्षे घरातूनच काम केले असा त्यांच्यावर सतत विरोधकांकडून आरोप होत आहे. त्याचीच री आता श्रीकांत शिंदे यांनी ओढली आहे. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या या टिकेला आता ठाकरे गट कशा पद्धतीने उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world