सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवार आले, त्यावेळी काय झालं?

बारामती नगरपालिका आवारातील शास्त्री यांच्या पुतळ्या समोर दोघेही एकाचवेळी आमने-सामने आले. त्यावेळी सुनेत्रा पवारांना पाहील्यानंतर युगेंद्र पवार यांनी त्यांची भेट घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

खासदार सुनेत्रा पवार या बारामतीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्याच वेळी तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार ही आले. समोर काकी असल्याचे युगेंद्र यांनी पाहीले. त्यांनी लगेचच त्यांना नमस्कार करत त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी युगेंद्र पवारांनी नमस्कार घालत सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद घेतलेत. युगेंद्र पवारांनी राजकारणाचा कोणताही अडसर न ठेवता काकी सुनेत्रा पवार यांचा आशीर्वाद घेत संस्कृती जपल्याची त्यानंतर चर्चा सुरू झाली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांनी बारामतीत शास्त्री यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या अभिवादनावेळी बारामती नगरपालिका आवारातील शास्त्री यांच्या पुतळ्या समोर दोघेही एकाचवेळी आमने-सामने आले. त्यावेळी सुनेत्रा पवारांना पाहील्यानंतर युगेंद्र पवार यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना नमस्कार करत त्यांचा आशिर्वाद घेतला. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते. 

ट्रेंडिंग बातमी - मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला NDTV मराठीच्या हाती, कोणाच्या वाट्याला किती जागा?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. पवार कुटुंबातही फुट पडली. कार्यकर्ते विभागले गेले. कुटुंबही विभागलं गेलं. पण नाती आजही जपली गेली असल्याचे बारामतीत दिसून आले. युगेंद्र पवार हे सध्या बारामतती तळ ठोकून आहेत. ते आगामी विधानसभा निवडणूक शरद पवार गटाकडून लढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्यांची लढत थेट अजित पवारांबरोबर होईल. त्यामुळे दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांमध्ये खून्नस दिसून येत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - '50 जणांना पाडणार' यादी तयार, टोपे, पवार,पाटील यांच्यासह यादीत कोणा कोणाची नावं?

शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुनेत्रा पवार यांना पराभव सहन कराला लागला होता. त्याची परतफेड विधानसभेला करण्याचा चंग अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना बाधला आहे. अशा वेळी सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार हे आमने सामने आले. दोन पक्षात असलेला तणाव, कुटुंबात असलेला तणार पाहात हे दोघे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र युगेंद्र यांनी आपले काकीचे आशिर्वाद घेतले.  सुनेत्रा काकीनेही युगेंद्र यांना आशिर्वाद दिले.  
 

Advertisement