जाहिरात

Mumbai BJP : फडणवीसांच्या निकटवर्तीयाला मुंबईचा अध्यक्ष करण्यास भाजपामधूनच विरोध? काय आहेत कारणं?

Mumbai BJP : फडणवीसांच्या निकटवर्तीयाला मुंबईचा अध्यक्ष करण्यास भाजपामधूनच विरोध? काय आहेत कारणं?
मुंबई:

Mumbai Bjp President : भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याचा फैसला अद्याप झालेला नाही. त्यातच मुंबई भाजपाचा अध्यक्ष कोण होणार? ही नवी चर्चा राज्यात सुरु झाली आहे. विद्यमान मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) कॅबिनेट मंत्री झाले आहेत. भाजपामधील 'एक व्यक्ती, एक पद' या सूत्रानुसार त्यांना मुंबई भाजपा अध्यक्षपद सोडावं लागेल. मुंबई महापालिकेच्या निवडणुका बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत. त्या आगामी काळात होण्याची शक्यता आहे. भाजपासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. या निवडणुकीच्या कालखंडात मुंबई भाजपाची सूत्रं कुणाला मिळणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

फडणीसांच्या जवळच्या नेत्याचं नाव चर्चेत पण...

मुंबई भाजपा अध्यक्षपदासाठी आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचं नाव चर्चेत आहे. दरेकर गेल्या 10 वर्षांपासून भाजपामध्ये सक्रीय आहेत. सहकार क्षेत्रात दबदबा असलेले ते भाजपाचे एकमेव नेते आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना ते विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते होते. पण, आता दरेकरांनाच मुंबई भाजपा अध्यक्ष करु नका, असा भाजपामधूनच होरा लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

National Herald : नॅशनल हेरॉल्ड केस काय आहे? सोनिया, राहुल गांधी किती अडचणीत? वाचा सविस्तर माहिती

( नक्की वाचा : National Herald : नॅशनल हेरॉल्ड केस काय आहे? सोनिया, राहुल गांधी किती अडचणीत? वाचा सविस्तर माहिती )

मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी रेसमध्ये कोण?

मुंबई भाजपा अध्यक्षपदाच्या रेसमध्ये प्रवीण दरेकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर आमदार अमित साटम, आमदार अतुल भातखळकर आणि माजी आमदार सुनील राणे यांची नावं देखील चर्चेत आहेत. 

पण सूत्रांच्या मते, भाजपमधल्याच काही नेत्यांनी दरेकर यांना विरोध सुरु केला आहे. दरेकरांना विद्यार्थी सेना, मनसे आणि भाजपा अशा तीन संघटनांचा अनुभव आहे. पण दरेकर मुळचे भाजपाचे नाहीत असा त्यांच्या विरोधकांचा आक्षेप आहे. 

विधान परिषदेचे आमदार आणि विरोधीपक्ष नेतेपदाचाही त्या अनुभव आहे. पण भाजपच्या संघटनात्मक पातळीवर त्यांना अनुभव नसल्याची चर्चा होतीय. मुंबईतल्या सहकार क्षेत्रातल्या बड्या अशा मुंबै बँकेवर दरेकर अध्यक्ष पण स्थानिक पातळीवरच्या नेत्यांशी त्यांचा राबता कमी असल्याचा दावा करण्यात येतोय., 

दरेकर हे मराठी आणि कोकणी चेहरा, ही जमेची बाजू आहे. पण मराठी वगळता, इतर समाजातल्या जनसंपर्कावर शंका व्यक्त केली जात आहे. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयावर बोलताना नेमकं उत्तर दिलेलं नाही. 'भाजपा संघटनात्मक निवडणुका सध्या सुरू आहेत कोणत्याही एका नेत्याचं नाव निश्चित नाही निवड करताना कोणत्याही व्यक्ती लादला जाणार नाही याची गुणवत्ता आहे त्याचीच निवड केली जाईल,' असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. 

बावनकुळेंनीही दरेकर यांना होणाऱ्या विरोधावर स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. या उलट त्यांनी कुणालाही लादणार नाही. असा पवित्रा घेत सूचक संकेत दिले आहेत. त्यामुळे मुंबई भाजपाचा अध्यक्ष कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर आणखी गुंतागुतीचं बनलं आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: