महायुतीचं ठरलं? जागा वाटपासाठी शिंदे- फडणवीस- पवार एकत्र, नागपुरात मध्यरात्री काय झालं?

सध्या महायुतीत नेते एकमेकावर टिका करत आहेत. शिवाय जागांवरूनही रस्सीखेच सुरू आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.

Advertisement
Read Time: 3 mins
नागपूर:

महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरून खलबतं सुरू आहेत. महायुतीचे जागावाटप लवकर व्हावे अशी तीन ही पक्षांची भावना आहे. त्या पार्श्वभूमिवर नागपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मध्य रात्री एक महत्वाची बैठक झाली आहे. सध्या महायुतीत नेते एकमेकावर टिका करत आहेत. शिवाय जागांवरूनही रस्सीखेच सुरू आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे हे नेतेही उपस्थित होते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम नागपुरात आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने महायुतीचे सर्वच प्रमुख नेत नागपूरात होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला रवाना होणार होते.पण त्यांनी तसे केले नाही. कार्यक्रमानंतर ते रेशीमबागेत गेले. त्यानंतर मुंबईला न जाता नागपूरच्या शासकीय निवासस्थानी परतले. त्यानंतर महायुतीचे एकएक नेते त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. आधी फडणवीस नंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, बावनकुळे,सुनिल तटकरे हे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. 

ट्रेंडिंग बातमी - मालेगावात गाऊन गँगचा धुमाकूळ ! चोरीसाठी नवा फंडा, नागरिकांमध्ये भीती

रात्री आठ वाजता सर्व जण एकत्र येण्यास सुरूवात झाली. सर्व नेते एकत्र आल्यानंतर जागा वाटप, महायुतीतील वाद, निवडणुकीची रणनिती यावर चर्चा झाल्याचे समजत आहे. काही जागांवरून महायुतीत वाद आहे. दावे प्रतिदावे केले जात आहेत. भाजपला जास्त जागा लढायच्या आहेत. त्यांनी तसे बोलूनही दाखवले आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातले वाद लपून राहीले नाहीत. त्यामुळे महायुतीत पेच निर्माण झाला आहे. यातून मार्ग कसा काढायचा यावर चर्चा करण्यात आली आहे. भाजपसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे जागा वाटपात अडचणी येत आहेत. ही बैठक रात्री पावणे बारा वाजेपर्यंत सुरू होती. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी पहिल्यांदाच आकडा सांगितला

ज्या जागांवर तीन ही पक्षांचा दावा आहे. ज्या जागा वादातील आहेत. अशा जागांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.शिवाय इच्छुकांची संख्याही मोठी आहे. अशा वेळी जो उमेदवार निवडून येवू शकतो, त्यालाच प्राधान्य देण्यात येईल यावर तीन ही पक्षांचे एकमत झाले आहे. पण अशा वेळी जागांचे गणित बिघडले. यावरही चर्चा झाली. अशा वेळी जागांची भरपाई कशी करायची यावर मात्र सर्व गोष्टी अडल्याचेही समजत आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - जोडे मारो आंदोलन, मविआचा मोर्चा पोलीस रोखणार? हुतात्मा चौकात काय स्थिती?

गेल्या काही दिवसात महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. महायुतीतील नेते एकमेकांवर टिका करत आहेत. ही टिका टोकाची आहे. यामुळे जनतेत चुकीचा संदेश जात आहे. अशा वेळी याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. याबाबत या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या पुढच्या काळात आपसातील वाद चव्हाट्यावर येणार नाहीत याची काळजी घेण्याचे ठरले आहे. त्याबाबत आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितले जावे असेही निश्चित झाले आहे. मात्र या बैठकीत कोण किती जागा लढणार कोणाला कोणतही जागा मिळणार याबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. या बैठकीतून जागा वाटपाची चर्चा मात्र सुरू झाली आहे. 

Advertisement