जाहिरात

Vasant Chavan : विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, नांदेड शोककूल 

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वसंत चव्हाण यांचा विजय महत्त्वाचा मानला जात होता.

Vasant Chavan : विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, नांदेड शोककूल 
नांदेड:

नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं (Nanded MP Vasant Chavan) आज हैद्राबादच्या किन्स रुग्णालयात आजारपणातून निधन झालं. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024)  त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती आणि भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांना पराभूत केलं होतं. माजी मुख्यमंत्री आणि पूर्वी काँग्रेसचे बलाढ्य नेते म्हणून ओळख असलेल्या अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे इथली लढत ही काँग्रेससाठी अत्यंत कठीण मानली जात होती. मात्र वसंत चव्हाण यांनी या मतदारसंघातून चिखलीकरांचा सहजरित्या पराभव केला होता.

गेल्या दीड वर्षांपासून ते डायलेसिसवर होते. गेल्या आठवड्यात 15 ऑगस्ट रोजी त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. आशिवाय अचानक बीपी देखील कमी झाला होता. त्यानेळी त्यांना तत्काळ नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना हैद्राबादला हलविण्यात आलं होतं. 

नक्की वाचा - ठाकरे गटाचा आमदार भाजपच्या वाटेवर, PM नरेंद्र मोदींच्या स्वागतावेळी काय घडलं?

तेव्हापासून हैद्राबादच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. याशिवाय गेली दीड वर्षे ते डायलेसिसवर होते. एका कार्यक्रमामुळे डायलेसिस न झाल्याने ते घरी चक्कर येऊन पडल्याची माहिती आहे. दरम्यान आज हैद्राबाद येथील उपचारादरम्यान पहाटे तीन वाजता त्यांचं निधन झालं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com