भाजप आमदार नितेश राणे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक वेळा अडचणीत आले आहे. सध्या ते आपल्याला कट्टर हिंदूत्ववादी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून त्यांच्याकडून मुस्लीम विरोधी वक्तव्य येत आहेत. त्यांनी नुकतेच मस्जिदमध्ये घुसून मारू असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्या विरोधात राज्यभर प्रतिक्रीया उमटल्या होत्या. शिवाय त्यांच्याच पक्षाचे नेते हाजी आराफत शेख यांनीही नितेश राणे यांच्यावर खालच्या भाषेत टिका केली होती. त्यानंतर आता खासदार नारायण राणे यांनी नितेश राणे यांचे ते वक्तव्य चुकीचे होते हे मान्य केले आहे. पण त्यांनी नितेश राणे यांची बाजू सावरण्याचाही प्रयत्न केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नितेश राणे हे एकमागून एक वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टिकेची झोड उठत आहे. या पार्श्वभूमीवर आता खासदार नारायण राणे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे. नितेश राणे यांनी आत घुसून मारू असे जे काही वक्तव्य केले होते ते चुकीचे होते असं त्यांनी मान्य केले आहे. पण भारतात राहून देशाच्या विरोधी कृत्य करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध देशातील किती मुस्लीमांनी आवाज उठवला आहे असा प्रश्नही त्यांनी केला आहे. नितेश बोलला म्हणून त्याच्या विरुध्द आवाज उठवला जातोय. पण नितेशचे तोंड बंद केल, तर हजार नितेश राणे तयार होतील असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - भावी मुख्यमंत्री! महायुतीत आता 'या' दोन नेत्यांचे झळकले बॅनर
दरम्यान यावेळी नारायण राणे यांनी शरद पवारांवर जोरादार टिका केली. शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी काय केलं? त्यांनी महिलांवर होणारे अत्याचार का थांबले नाहीत. त्या वेळची यादी काढू का? असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिवाय ज्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळी तुम्ही महिलांना पाच हजार का दिले नाहीत असा सवाल त्यांनी केला आहे. शरद पवारांनी लाडकी बहिण योजने वर बोलताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित केला होता. त्याला राणे यांनी उत्तर दिले.
ट्रेंडिंग बातमी - 'मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नाही' ठाकरेंनी माघार का घेतली? थेट कारण सांगितलं
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ही जोरदार टिका केली. उद्धव ठाकरे यांना काही समजत नाही. मग ते मुख्यमंत्री कसे होणार असे ते म्हणाले. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी काही केलं नाही केवळ फुकट मानधन घेतलं अशी टिका त्यांनी केली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनाही सोडले नाही. संजय राऊत यांना अक्कल नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही. त्यामुळे त्यांच्यावर अधिका काही बोलणार नाही असंही सांगायला ते विसरले नाहीत.
नक्की वाचा - 10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!
आपल्याला पंतप्रधानपदाची ऑफर विरोधकांनी दिली होती असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला होता. त्यावर नारायण राणे यांनी अधिक बोलणे टाळले. ते माझे चांगले मित्र आहेत. ते काय बोलले याबाबत आपल्याला काही कल्पना नाही. शिवाय त्या विषयावर आपल्याला काही बोलायचं नाही असंही राणे यावेळी म्हणाले. यावर बोलणे राणे यांनी टाळले. एक वेळ अशी होती की राणेंच्या मंत्रिमंडळात गडकरी हे मंत्री होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world