
पुण्यात शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले होते. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या समोरचं हा सगळा राडा झाला. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्व साधारण सभेत हा प्रकार घडला. जवळपास दोन तास हा गदारोळ सुरू होता. अजित पवार गटाचे मंत्री वळसे पाटील यांच्या विरोधात विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम या दोघांचे हे समर्थक होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी बोलताना देवदत्त निकम यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टिका केली. आम्हाला बसू दिलं नाही, मंचावर येऊ दिलं नाही, बैठकीत वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला, हे सगळं घडवून आणण्यासाठी ते गुंड घेऊन आले होते, असा आरोप निकमांनी केला आहे. या मुद्द्यांवरून वळसे आणि निकमांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले.
एकमेकांच्या दिशेने खुर्च्या ही फेकण्यात आल्या. शेरेबाजी ही करण्यात येत होती. यावेळी दिलीप वळसे पाटलांनी उपस्थितातांना शांततेचं आवाहन केलं. पण त्याचा काही एक परिणाम दोघांच्याही समर्थकांवर झाला नाही. राडा वाढतच गेला. शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. पोलीसांनी देवदत्त निकम यांना बाहेर जाण्याची विनंती केली. त्यानंतर निकम आपल्या समर्थकांसह बाहेर पडले.
ट्रेडिंग बातमी - कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण बाजी मारणार? महाडिक विरुद्ध पाटील सामना रंगणार
आम्हाला सभेतून हकलण्यासाठी गुंड आणल्याचा आरोप केला यावेळी देवदत्त निकम यांनी केला आहे. मात्र हे सगळे आरोप अजित पवार गटाने फेटाळले आहेत. विनाकारण राजकीय रंग देऊन स्वतःची पोळी भाजण्याचे प्रयत्न निकामांनी केल्याचा पलटवार करण्यात आला. देशातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर कारखान्याच्या वार्षिक बैठकीत हा गदारोळ करून काय साध्य केलं. उलट कारखाना बदनाम करण्याचे प्रयत्न केले.असा पलटवार अजित पवार गटाचे नेते शिवाजी आढळरावांनी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world