Ajit Pawar Death: अजितदादांच्या विमान अपघाताला कारणीभूत कोण? रोहित पवारांचं ट्वीट व्हायरल," गडकरी साहेबांनी.."

आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून या कंपनीबाबत खळबळजनक माहिती समोर आणली आहे. केंद्रीय नितीन गडकरी यांनी VSR कंपनीच्या विमानांनी प्रवास टाळाण्याचा सल्लाही पवारांनी दिला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Rohit Pawar Tweet On Ajit Pawar Death

Rohit Pawar Tweet On Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता. विमान धावपट्टीवर कोसळल्याने मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. व्हीएसआर (VSR) विमान कंपनी अजित पवारांच्या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी या कंपनीबाबत ट्वीटच्या माध्यमातून खळबळजनक माहिती समोर आणली आहे. केंद्रीय नितीन गडकरी यांनी VSR कंपनीच्या विमानांनी प्रवास टाळाण्याचा सल्लाही पवारांनी दिला आहे.

रोहित पवार ट्वीटरवर नेमकं काय म्हणाले?

"अजितदादांच्या विमान अपघातास कारणीभूत असलेली VSR कंपनी मोठ्या प्रमाणावर गैरकारभारात गुंतलेली असून VSR कडून कसलेही नियम - कायदे पाळले जात नाहीत तसंच त्यांची बहुतांश विमाने सदोष आहेत हे आम्ही सातत्यानं पुराव्यानिशी समोर आणलं आहे. सत्ताधारी पक्षात अनेक हालचाली होण्याच्या या परिस्थितीत 'दिल्लीतल्या सत्ताधारी पक्षातील महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा तसंच अजातशत्रू नेतृत्व' असलेल्या मा. नितीन गडकरी साहेबांनी VSR कंपनीच्या विमानांनी प्रवास टाळावा.

नक्की वाचा >> Shocking News: मित्राला पासवर्ड पाठवला अन् क्षणातच रुममध्ये विद्यार्थीनीसोबत आक्रित घडलं! 40 कॉल केले, पण..

आपल्या कार्यालयाने हे विमान बुक केले असल्यास आपण त्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात आणि हे विमान केंद्रीय हवाई मंत्रालयाकडून बुक झाले असेल तर विमान मंत्री आणि VSR चे आर्थिक संबंध असल्याने त्यांना आपल्या सुरक्षेपेक्षा VSR चा धंदा महत्वाचा आहे, त्यामुळे आपण काळजी घ्यावी!"

नक्की वाचा >>Kalyan News: बारमध्ये पैसे उडवण्यासाठी 3 जणांनी केलं भयंकर कृत्य, वरिष्ठ पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली अन्..