जाहिरात

Kalyan News: बारमध्ये पैसे उडवण्यासाठी 3 जणांनी केलं भयंकर कृत्य, वरिष्ठ पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली अन्..

कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बारमध्ये पैसे उडवण्याच्या सवयीमुळे तीन जणांनी चोरीचा गुन्हा केला. या सराईत चोरट्यांना कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांनी पोलिसांनी अटक केली आहे.

Kalyan News: बारमध्ये पैसे उडवण्यासाठी 3 जणांनी केलं भयंकर कृत्य, वरिष्ठ पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली अन्..
Kalyan Gold Robbery Crime

Kalyan Robbery News : कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बारमध्ये पैसे उडवण्याच्या सवयीमुळे तीन जणांनी चोरीचा गुन्हा केला. या सराईत चोरट्यांना कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांनी पोलिसांनी अटक केली आहे.रामबाग परिसरात एका नामांकित हॉटेल चालकाचा गळ्यातील महागडी चेन हिसकावून तीन चोरटे फरार झाले होते. ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली होती.त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.पोलिसांनी सापळा रचत एका  बारमधून तिघांना ताब्यात घेतले. दिलनवाज अन्सारी,रिजवान खान आणि शाहरुख शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सापळा रचत तिन्ही आरोपींना बारमधून केली अटक

कल्याणचे डिसीपी अतुल झेंडे,एसीपी कल्याणजी घेटे आणि पोलीस स्टेशन  सिनियर पीआय बालकृष्ण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विकास मडके यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी मुंबईतील गोवंडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत एका बारमधून तिघांना ताब्यात घेतले.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात PMRDA ने रचला इतिहास! 'या' सेक्टरमध्ये फक्त 95 दिवसांत बांधली 14 मजली इमारत

प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती उघड

दिलनवाज अन्सारी,रिजवान खान आणि शाहरुख शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.विशेष म्हणजे,या तिघांना बारमध्ये जाऊन पैसे उडवण्याची सवय असून त्यासाठीच ते चोरी आणि लूटमार करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दरम्यान,या आरोपींनी आतापर्यंत आणखी किती चोरी आणि लूटमार केल्या आहेत, याचा सखोल तपास पोलीस अधिकारी विकास मडके यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात सराईत टोळीचा थरार, Amazon कंपनीच्या गेटसमोर घडला सर्वात भयंकर प्रकार, पोलिसही हादरले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com