जाहिरात

Shocking News: मित्राला पासवर्ड पाठवला अन् क्षणातच रुममध्ये विद्यार्थीनीसोबत आक्रित घडलं! 40 कॉल केले, पण..

उत्तरखंडच्या नैनीताल जिल्ह्यात एमबीपीजी कॉलेजच्या 24 वर्षीय विद्यार्थीनीने टोकाचं पाऊल उचललं.

Shocking News: मित्राला पासवर्ड पाठवला अन् क्षणातच रुममध्ये विद्यार्थीनीसोबत आक्रित घडलं! 40 कॉल केले, पण..
College Girl Death News

MBPG Student Crime News: उत्तरखंडच्या नैनीताल जिल्ह्यात एमबीपीजी कॉलेजच्या 24 वर्षीय विद्यार्थीनीने जीवनं संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एका मित्राला पासवर्ड सेंड केला. अचानक आलेल्या पासवर्डमुळे मित्राला धक्का बसला. त्यानंतर त्याने तरुणीला एका पाठोपाठ 40 कॉल केले.पण तिने कॉल रिसिव्ह केले नाहीत. त्यानंतर तो तरुणीच्या घरी पोहोचला. तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहून त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. 

एमबीपीजी कॉलेजची विद्यार्थीनी दिव्या आर्याच्या आत्महत्येच्या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. काठगोदाम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चांदमारी परिसरात ही घटना घडली. रविवारी सायंकाळी दिव्याने कुटुंबीयांसोबत जेवण केलं आणि तिच्या रुममध्ये गेली. त्यानंतर तिने एका मित्राला मेसेज पाठवून मोबाईलचा पासवर्ड पाठवला.

नक्की वाचा >> Kalyan News: बारमध्ये पैसे उडवण्यासाठी 3 जणांनी केलं भयंकर कृत्य, वरिष्ठ पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली अन्..

मित्राने केले 40 कॉल

अचानक आलेल्या या मेसेजला पाहून त्याने दिव्याला कॉल केले. एका पाठोपाठ 40 कॉल केले. पण दिव्याने त्याच्या कॉलला कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तो दिव्याच्या घरी गेला. दिव्याने गळफास घेतल्याचं पाहताच त्या तरुणाला मोठा धक्का बसला. 

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात PMRDA ने रचला इतिहास! 'या' सेक्टरमध्ये फक्त 95 दिवसांत बांधली 14 मजली इमारत

घरात सर्वजण होते, पण..

ज्या वेळी दिव्याने आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं, त्यावेळी तिचं संपूर्ण कुटुंब दुसऱ्या रुममध्ये होतं.पण कोणालाही दिव्या असं काही करेल, याचा अंदाज नव्हता. कुटुंबीयांनी दिव्याचा मृतदेह खाली उतरवला आणि रुग्णालयात पाठवला. पण डॉक्टरांनी दिव्या मृत झाल्याचं घोषित केलं. दरम्यान, पोलिसांनी दिव्याचा मोबाईल जप्त करून पुढील तपास सुरु केला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com