जाहिरात
This Article is From Jan 26, 2025

Mahakumbh 2025: 'ध्रुतराष्ट्र बनू नका' महाकुंभ अन् विरोधक, योगींनी आवाहन काय केलं?

कुंभ हे सनातन धर्माचे महापर्व आहे. त्यात सर्वांनी सहभागी झालं पाहीजे. यात कुठेही जात,पात, प्रांत, भाषा येत नाही असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

Mahakumbh 2025: 'ध्रुतराष्ट्र बनू नका' महाकुंभ अन् विरोधक, योगींनी आवाहन काय केलं?
प्रयागराज:

महाकुंभमध्ये सहभागी व्हावं यासाठी सर्वांनाच आमंत्रण दिलं आहे. जे येतील त्यांचे स्वागत आहे. त्रिवेणी संगमात जे डुबकी मारतील ते पुण्य कवलतील. ते पुण्यचे भागिदार होतील असं वक्तव्य करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना चिमटे काढले आहेत.  महाकुंभ संवादमध्ये NDTV ते एडिटर इन चीफ संजय पुगलिया यांना दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांना सल्ला देताना ध्रुतराष्ट्र बनू नका, संजयच्या डोळ्या पाहू नका. प्रत्यक्ष कुंभमध्ये सहभागी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

कुंभ हे सनातन धर्माचे महापर्व आहे. त्यात सर्वांनी सहभागी झालं पाहीजे. यात कुठेही जात,पात, प्रांत, भाषा येत नाही. आम्ही सर्वांना या कुंभमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. विरोधकांनीही या कुंभमध्ये त्रिवेणी संगमामध्ये डुबकी मारली आहे याबाबत योगी यांना विचारण्यात आल्यानंतर ते बोलत होते. ज्यांनी कुंभमध्ये सहभाग घेतला. ज्यांनी त्रिवेण संगमात स्नान केले ते धन्य झाले. ते पुण्यचे भागिदार झाले. जे आले नाहीत, पण त्यांनी मनातले भाव चांगले ठेवले असतील तरी त्यांचे स्वागत. जे सनातन धर्माबाबत चांगल्या भावना ठेवतात त्यांचे ही आम्ही धन्यवाद देतो असंही योगी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Yogi Adityanath: 'कुंभ सनातन धर्माचं महापर्व, जगासाठी अकल्पनीय' योगी आदित्यनाथ थेट बोलले

प्रयागराज हे सर्वांचे आहे. इथं येण्यासाठी सर्वांना आमंत्रण दिलं आहे. हे भारताचे आयोजन आहे. ते करण्याचे भाग्य उत्तर प्रदेशला मिळाले आहे. सर्वजण या माध्यमातून जोडले जात आहेत. इथं भेदभाव नाही. पण काही लोक आजही आहेत जे एकमेका भेदभाव करतात. त्यांची वृत्ती फोडा आणि राज्य करा अशी आहे. ते नेहमीच देश आणि उत्तरप्रदेशावर टीका करत असतात. त्यांचे विचार नकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांनी ध्रुतराष्ट्र बनू नये. संजयच्या नजरेतून पाहू नयेत. प्रत्यक्ष कुंभमध्ये यावं. इथं सर्वच लोक प्रेमाने आणि आस्थनेही सहभागी झाले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Pankaja Munde: मनोज जरांगेंना भेटणार का? पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य, आता पुढे काय होणार?

जे लोक कोविड काळात गायब होते. मात्र उत्तर प्रदेश सरकारने चांगल्या सोई उपलब्ध करून दिल्यानंतर टीका करत होते. लसीकरणा वेळी त्यांनी समाजा समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला. ते हेच लोक होते ज्यावेळी अयोध्येत राममंदीर झाले त्यावेळी त्यांच्या प्राण प्रतिष्ठापनेला हेच लोक आले नव्हते. उलट ते नकारात्मक टीका करत राहीले. ते कुठल्या तोंडाने येणार होते असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने विरोधकांना केला. प्रयागराजमध्ये  सर्वांनी यावं असं आवाहन केलं होते. पण सनातन धर्म कोणावरही जबरदस्ती करत नाही हे सांगायला ते विसरले नाहीत. 

ट्रेंडिंग बातमी - IND vs ENG: सचिन तेंडुलकरला 'या' बॅट्समनची बॅटींग पहायला आवडते, म्हणाला त्याची बॅटींग पहाणे म्हणेज...

सनातन धर्म हा राष्ट्रीय धर्म आहे. मानवतेचा धर्म सनातन धर्म आहे. जाती, पंत, संप्रदाय वेगवेगळा असू शकतो. पण धर्म एकच आहे. तो सनातन धर्म आहे. कुंभ हा त्या सनातन धर्माचे महापर्व आहे. त्यामुळे कुंभचं महत्व वेगळं आहे. इथं जर कुणी स्नान करणार असेल तर पुण्यचा भागिदार होईल असं ही योगी म्हणाले. काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही त्रिवेणी संगमात स्नान केले होते. संगमाचे पाणी यावेळी प्रवाही आणि स्वच्छ असल्याचा टोला या निमित्ताने योगी यांनी अखिलेश यांना लगावला. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com