गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात मोठ्या प्रमाणात भावीक जात असतात. या काळात मुंबई गोवा महामार्गावरून अनेक जण प्रवास करतात. पण या हायवेची स्थिती पाहाता अनेक तास जाण्यासाठी लागतात. खराब रस्ता, वाहतूक कोंडी यामुळे चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रेल्वेही हाऊस फुल असते. यावर आता बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी रामबाण उपाय शोधून काढला आहे. त्यामुळे कोकणवासीयांचा त्रास कमी तर होणारच आहे, पण अवघ्या पाच तासात मुंबईहून मालवण गाठता येणार आहे. एनडीटीव्ही मराठीच्या 'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमात त्यांनी आपला प्लॅन सांगितला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा ))
मुंबईतून कोकणात जाताना अनेक संकटाना चाकरमान्यांना तोंड द्यावं लागतं. त्यात मुंबई गोवा हायवे हा गेली कित्येक वर्ष रखडला आहे. रेल्वे आहे पण ती सर्व ठिकाणी जाते असं नाही. त्यामुळे रस्ते मार्गा शिवाय पर्याय नाही. मात्र बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या अडचणीवर तोडगा शोधून काढला आहे. त्यांनी 'NDTV मराठी मंच' वर बोलताना सुमद्रात जल वाहतूकीसाठी मोठी संधी आहे असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून यावर काम करायला सांगितलं आहे असं ही ते यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - NDTV Marathi Manch: वाढवण बंदर गेमचेंजर ठरणार, नितेश राणेंना विश्वास
त्याचाच एक भाग म्हणून माझगाव ते मालवण ही सेवा समुद्रातून सेवा सुरू केली जाणार आहे. या वर्षीच्या गणेश चतुर्थी पासून ती सुरू होईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे. एम 2 एम जेटी मार्फत रो- रो सेवा उपलब्ध करुन दिली जाईल. त्यामुळे त्यातून तुम्ही तुमच्या गाड्या ही गावी घेवून जावू शकणार आहात असंही राणे म्हणाले. हा प्रवास पाच ते सहा तासांचा असेल असंही त्यांनी सांगितलं. या दोन स्टॉप असतील. ज्यांना मालवणला उतरायचं आहे ते मालवणला उतरली. ज्यांना विजयदुर्गला उतरायचं आहे ते विजयदुर्गचा पर्याय निवडतील. त्याबाबत तयारी सुरू असल्याचं ही त्यांनी सांगितलं.
त्याच बरोबर मेट्रोमुळे मुंबईकरांचे आयुष्यात फरक पडला आहे.कोस्टल रोडमुळे ही अनेक बदल झाले आहेत. तोच विचार घेवून जल वाहतूक एमएमआर रिजनमध्ये सुरू केली जाईल. त्यासाठी वॉटर मेट्रो यावर आमचं खातं काम करत आहे, असं नितेश राणे म्हणाले. सध्या केरळात कोचीमध्ये वॉटर मेट्रो सुरू आहे. तशीच मुंबईत ही सुरू होईल. त्याले एक वर्षाचा कालावधी लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यासाठी 8 लोकेशन शोधली जात आहेत. तिथे ही वॉटर मेट्रो सेवा मिळेल. कोकणातही वॉटर ट्रान्सपोर्टचा मोठा फायदा होणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान मे महिन्या अखेर मुंबई गोवा हायवेचे काम पूर्ण होईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.