जाहिरात

Political news: निवडणूक आयोगा विरोधात विरोधकांचा मोर्चा, तारीख ठरली, 'हे' बडे नेते होणार सहभागी

त्यामुळेच आम्ही त्यांना दणका देण्याचं ठरवलं असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

Political news: निवडणूक आयोगा विरोधात विरोधकांचा मोर्चा, तारीख ठरली, 'हे' बडे नेते होणार सहभागी
मुंबई:

निवडणूक आयोगा विरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. विरोधी पक्षाच्यावतीने आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसचे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगा विरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं. आयोग आमचं ऐकायला तयार नाही. त्यामुळे त्यांना दणका द्यावा लागेल. त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल असं राऊत यावेळी म्हणाले. या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेसचे बडे नेते या मोर्चात सहभागी होतील असं यावेळी राऊत यांनी स्पष्ट केलं.   

पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच मनसेचे सहकारी 24 वर्षांनी शिवसेना भवनात आले आहेत असं राऊत म्हणाले. तर  जयंत पाटील  प्रथमच आले आहेत असं त्यांनी सांगितलं. आम्हाला ही पत्रकार परिषद घाई घाईने घ्यावी लागल्याचं ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्या बाबत सर्व प्रमुख पक्ष लढाई करत आहेत. आता ही लढाई महाराष्ट्रमध्ये सुरु झाली आहे असं ते म्हणाले. देशपातळीवर राहुल गांधींनी याची सुरुवात केल्याचं ते म्हणाले. 1 कोटी मतदार घुसखोर आहेत. विलास भुमरे बोलले होते 20 हजार मतदार मी बाहेरून आणले. मंदा म्हात्रे यांनी ही बोगस मतदारांचा प्रश्न मांडला होता. सत्ताधारी पक्षाचे आमदार हे बोलत आहेत. संजय गायकवाड बोलले की 1 पेक्षा जास्त बोगस मतदार बुलढाणा जिल्ह्यात आढळून आले आहेत. घोटाळा करून हे लोक सत्तेवर येत आहेत. मतदार याद्या पवित्र असल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे. सत्ताधारी वगळून सगळे पक्ष निवडणूक आयोगाला भेट देत होते. आमची भूमिका ते ऐकून घ्यायला तयार नाही. याद्या निर्दोष असल्याच ते बोलतात. पण तसं नाही. त्यामुळेच आम्ही त्यांना दणका देण्याचं ठरवलं असल्याचं राऊत यांनी सांगितलं.  

नक्की वाचा - Pune News: शनिवार वाड्यात नमाज पठण! ट्वीटमुळे ट्वीस्ट, त्या व्हिडीओ मागचे सत्य काय?

यावेळी जयंत पाटील म्हणाले की राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर आमच्या चर्चा झाल्या. आयोगाकडून काल जे उत्तर आलं ते समाधानकारक नाही असं ही ते म्हणाले. जे निवडणूक लढावणार आहेत ते सगळे हा मोर्चा काढून लढणार आहेत. सत्तेत असणारे सहभागी झाले तरी आमची त्यांना ना नाही. चोरीच्या वाटेने जे आले आहेत ते कदाचित आमच्या मोर्च्यात येणार नाही. पण ज्यांना लोकशाहीला धक्का पोहोचवण्याचं काम करायचं आहे त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे. आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोगाने वेळीचं चुका सुधाराव्यात. आमचे अनेक प्रश्न आहेत त्यालाही उत्तर द्यावी असं जयंत पाटील म्हणाले.  Duplication of votes ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी निवडणूक आयोग काय करणार आहे. ज्यांचे पत्ते चुकीचे आहेत, त्यांच्याबद्दल काय करणार आहेत. या सगळ्याचा खुलासा जनतेला दिला पाहिजे. माहितीचा अधिकारी देशात आला पारदर्शक्ता निर्माण व्हावी यासाठी असं ही ते म्हणाले. आणखी काही दिवसात आम्ही अजून पुरावे सादर करणार आहोत. मतदान हा पाया आहे. त्यासाठी सर्वांनी या मोर्च्यात सहभागी व्हावं अशी आम्ही अपेक्षा करतो असं जयंत पाटील म्हणाले. 

नक्की वाचा - Buldhana News: शिंदेंच्या आमदाराचा 'कार'नामा! कमिशन म्हणून ठेकेदाराकडून घेतली 2 कोटींची डिफेंडर कार, सत्य काय?

तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही निवडणूक आयोगा विरोधात आक्रमक भूमीका घेतली. एकंदरीत विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. तो महाराष्ट्रामधील तमाम जनतेने घेतला आहे असं ते म्हणाले. केवळ लोक नाही तर स्वतःचे आमदार अशी साक्ष देत आहेत. निवडणूक आयोगाची विश्वासहर्ता राहिली पाहिजे. निवडणूक आयोग थातूरमातुर उत्तर देत आहे. त्यांनी घोळ मान्य केला असेल आणि जर डोळे झाक करणार असतील तर रस्त्यावर उतरावं लागेल असं ही नांदगावकर म्हणाले. पूर्ण ताकदीने आम्ही या मोर्च्यात उतरणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं.  तर काँग्रेस नेते  सचिन सावंत यांनी ही आयोगाला धारेवर धरलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुरावे दाखवून सिद्ध केलं आहे वोट चोरी होत आहे. मतदान हा अधिकार आहे. तुम्ही जर तोच काढून घेणार असाल तर काय उपयोग असा प्रश्न त्यांनी केला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com