पार्थ पवार अॅक्टीव्ह मोडमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला बळ मिळणार?

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात पार्थ पवार हे फिरताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

सूरज कसबे 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पिंपरी चिंचवड हा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात तब्बल दहा वर्षांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे सक्रिय झाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात पार्थ पवार हे फिरताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पक्ष बांधणी संदर्भात चर्चा ही करताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पार्थ हे पिंपरी चिंचवडमध्ये सक्रीय झाले आहेत. आगामी निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदा होईल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.   

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 
    
काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी  पूरग्रस्त भागाचा दौरा पार्थ पवार यांनी केला होता. शिवाय पूरस्थितीचा आढावा त्यांनी घेतला होता. त्यानंतर त्यांनी शहरातील पक्ष कार्यकारणीची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा देखील केली होती. पार्थ जाणीव पूर्वक पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. यातून ते पक्षाला उभारणी देण्याचे काम करत आहे. लोकसभेला आपण आणि पक्षाने श्रींरग बारणे यांचे काम मनापासून केला. आता विधानसभेचा काम करायचे आहे त्यानुसार ते कामाला लागले आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - सरकारचा मोठा निर्णय, नगराध्यक्षांचा कालावधी वाढवला, आता अडीच वर्षा ऐवजी...

पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा जागा आहेत. या दोन्ही जागा लढण्यासाठी आम्ही आग्रही आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. पिंपरी आमचा पूर्वीपासूनचा मतदार संघ आहे. तर चिंचवड विधान मतदारसंघा मध्ये आम्हाला पोटनिवडणुकीमध्ये चांगल्या पसंतीचे मते मिळाली होती. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आम्ही या मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती. त्यामुळे हे दोन्ही मतदार संघ मिळावेत हा आमचा प्रयत्न असेल असे त्यांनी स्पष्ट केले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेची नियुक्ती? RSS-भाजपच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

पिंपरी चिंचवड शहरामध्ये पक्ष वाढीसाठी आता हालचाली करायला हव्यात असे पार्थ यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या भाजपचे वर्चस्व आहे. भारतीय जनता पक्षाचे चार आमदार शहरात आहेत. त्यात दोन  विधानसभेचे आणि दोन विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे भविष्यात पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचाही एखादा आमदार विधान परिषदेत असावा अशी आपली कल्पना आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची अजून नियुक्ती होणे बाकी आहे. अशा  वेळी पिंपरी चिंचवडच्या एकाची नियुक्ती त्याजागेवर व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - राणांनंतर शिंदेंनी केली अडचण, म्हणाले... 'लाडकी बहीण' योजनेतून तुमची नावं डिलिट करणार'

 एकीकडे पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ लक्ष घालत असले तरी तिकडे बारामतीच्या हालचालींकडेही त्यांचे लक्ष आहे. युगेंद्र पवार हे शरद पवार गटाकडून बारामतीतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केले आहे. युगेंद्र माझ्या पेक्षा मोठा आहे. त्याला बारामतीतून निवडणूक लढायची आहे. त्याबाबत शरद पवार निर्णय घेतली. त्याला संधी मिळाली तर ते निवडणूक लढतील. तो त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही असे त्यांनी सांगितले.  

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? महाविकास आघाडीत घमासान, वाद पेटणार?

या पुढच्या काळात संघटनेसाठी काम करण्याची इच्छा पार्थ पवार यांनी व्यक्त केली आहे. कोणतीही निवडणूक पुढच्या काळात लढणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. खासदार की असो की आमदारकी कोणतीही निवडणूक लढणार नाही असे ते म्हणाले. संघटना मजबूत करणे आणि पक्षाला पुढे घेवून जाणे हे आपले ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले. मावळ लोकसभा मतदारसंघातून  पार्थ पवार यांनी 2014 साली शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विरोधात निडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणामध्ये पार्थ पवार पुन्हा दिसले नाही. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये पिंपरी चिंचवड शहरांमध्ये त्यांचा वावर वाढला आहे.