
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. या दोघांची बंद दाराआड चर्चा झाल्याचं विश्वसनीय सुत्रांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे हे दिल्लीवारी करून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे ठाकरेंशी जवळ आल्याचं पाहिला दिसत आहे. शिवाय विधान परिषदेत त्यांनी तर ठाकरेंना थेट सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती. त्यात आज झालेल्या फडणवीस आणि ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मात्र टेन्शन वाढण्याची दाट शक्यता आहे.
आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची वांद्रे येथील सोफीटोल हॉटेलमध्ये भेट झाल्याचं समजत आहे. ही भेट जवळपास तीन तासा पेक्षा जास्त वेळ चालली. ही गुप्त बैठक समजली जात होती. त्यामुळे या बैठकीबाबत आता राजकीय तर्क लावले जात आहे. या हॉटेलमध्ये कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नव्हता. त्यामुळे ही राजकीय भेट असल्याचं बोललं जात आहे. ही ठरवून झालेली भेट आहे. पाचव्या मजल्यावर ही बैठक झाली असंही समजत आहे.
देवेंद्र फडणवीसांकडून जैन गुरूंच्या भेटीसाठी आल्याचं ट्वीट करण्यात आलं आहे. संध्याकाळी साडेसात वाजता आदित्य ठाकरे पोहचले होते. त्यानंतर पाच मिनिटांनी फडणवीस आले. त्यानंतर हे दोन्ही नेते भेटल्याचंही समजत आहे. बंद दाराआड या दोघांची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसात ठाकरे फडणवीसांचे सुर जुळताना दिसत आहे. दरम्यान एकाच हॉटेलमध्ये दोघे ही वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं ही बोललं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world